लखूभाई चौर्या पदवीविना आर्थ्योपेडिक
लखूभाई चौर्या हे नाव अनेकांना अपरिचित असेल तसेच कालपर्यंत मलापण अपरिचित होते पण आज मात्र खूपच परिचित झाले .सटाण्याहून जवळ जवळ 70किलोमीटर असेल त्यांचे गाव महाराष्ट व गुजरात सिमेवर बधाणा गावठा म्हणून गाव आहे गुगल मॅपवर लखूभाई चौर्या टाकले तरी त्यांचे ठिकाण कळेल सांगायचे म्हणजे मेडीकलची कोणतीही डिग्री नाही शालेय शिक्षण झाले असेल किंवा नाही पण नाडी तज्ञ म्हणून ओळखतात पाठ दुखत असेल मणके सटकले असतील कंबर दुखत असेल हात पाय दुखत असतील गुडगे दुखत असतील मान दुखत असेलअशा अनेक हाडदुखीवर रामबाण उपाय करतात .त्यासाठी दररोज लांबून लोक येतात प्रत्येक दिवशी जत्रेचे स्वरुप असते इलाज करुन घेण्यासाठी.मीही आज गेलो होतो .तेथे बघितले तर पाच पन्नास गाड्या आलेल्या लोकांची तोबा गर्दी होती मी सकाळी दहा वाजता गेलो तरी माझा नंबर 140 होता .कुणाचे गुडगे दुखत होते तर कुणाची पाठ कुणाची कंबर तर कुणाची मान फक्त दोन मिनिटात इलाज करतात नाडीचे तज्ञ आहेत त्यामुळे मणका सरकला असेल गुडघा सटकला असेल तर आपल्या हाताने दोन मिनिटात जागेवर बसवतात त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला ते ही फक्त 100 रूपये फि मध्ये .मला पण बसताना उठताना त्रास व्हायचा .खालचे मणके थोडे सरकले होते तेव्हा त्यांच्या उपचाराने माझा त्रास तेथेच संपला म्हणून माझाही विश्वास बसला दररोज 300 ते 400 लोक येतात .विचार करा एकाकडून शंभर रूपये व औषध पाहिजे असेल तर वरून 120 रूपये मग दिवसाचे किती कमवतो व महिण्याचे व वर्षाचे किती?तीही कोणतीही डिग्री नसतांना .डोंगर कपारीत राहणारा अत्यंत साधा माणूस पण त्यांना लोक शोधत शोधत तेथे पोहचतात व इलाज करून आनंदात व समाधानाने परतात .गुजरात सरकारने याबद्दल त्यांचा सत्कारही केलेला आहे असे तेथे कळले तेथे गेल्याशिवाय विश्वास बसणार नाही फक्त दोन मिनिटात तुम्ही बरे होणार. कोणते औषधे महागडी नाहीत ना कोणते आॅपरेशन .मी तर आश्चर्यचकित झालो म्हणून तुम्हांला वरील त्रास असेल तर जरूर भेट द्या व आश्चर्याचा एक अनुभव घ्या जसा मी घेतला कालच
बघा जायला जमतं का
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment