Skip to main content

बुरूज

ःबुरूज ढासळतो तेव्हा
गडाचा बुरूज जेव्हा ढासळतो तेव्हा गडाची पडझड व्हायला सुरवात होते तसेच घरातील ज्या माणसामुळे विरूध्द विचारांचे माणसे सुध्दा एकत्र नांदतात व आनंदात राहतात नाईलाजाने का होईना पण घर एकत्र दिसते पण तोच माणूस ढासळला  किंवा अचानक जगातून गेला तेव्हा हेच घरातील माणसे एकमेकांवर तुटून पडतात व तेघर तुटायला वेळ लागत नाही प्रत्येकजण आपआपले वेगळे चूल मांडायला सुरवात करतात तेव्हा सगळे संस्कार काहीजण पायदळी तुडवतात व काही दिवसांपूर्वी एकसंघ असलेले घर विखूरलेले दिसायला लागते व हे असे पूर्वीपासून चालू आहे . अनेक महापुरूष गेल्यावर किती बदल घडलेत पण सामान्य माणसांच्या बाबतीतही तसेच घडते मेन माणूस गेल्यावर घरातीलच माणसे संपतीसाठी एकमेकांवर तुटून पडतात व घर फुटते कुणाला कुणाचा धाक राहिलेला नसतो सर्वच बेफाम वागायला लागतात पण काही घरं त्याला अपवाद असतात मेन माणूस गेल्यावर त्याच्या आदर्शाला तडा जाणार नाही म्हणून एकसंघाचे दर्शन घडवतात पण हे चित्र फक्त बोटावर मोजण्याइतकंच दिसते .भाऊ भाऊ बहिण बहिण भाऊ बहिण काका चुलतभाऊ अजून जे एकत्र राहात होते ते सगळे एकमेकांचे तोंड बघत नाही .स्वार्थीपणा पुरेपुर त्यांच्यात घुसतो लहाणपणाच्या सर्व गोष्टी विसरतात आईबाबांनी थोरामोठ्यांनी सांगितलेल्या महापुरूषाच्या गोष्टी विसरतात व माझे माझे करत आपला संसार थाटतात .माझे माझे तुझे तुझे असे करत करत आपले हे सूत्र विसरतात म्हणून बुरूज ढासळला तरी दुसरा बुरूज घरातील माणसांनीच बनावं व घराला ढासळण्यापासून वाचवावं पण हे शक्य असूनही बर्‍याच वेळा अशक्य  बनते
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...