Skip to main content

खाणे व रोगांना बोलावणे

खाणे अन् रोगांना बोलावणे

माणसाचा जन्म जणू खाण्यासाठीच झाला आहे असे वाटते जेव्हा बघितले तेव्हा माणसं एकतर खातांना दिसतात नाहीतर पितांना आपण  खातो ते कुणी बनवले व कशापासून बनवले याचा कोणताही विचार न करता फक्त पैसे फेकले की मिळते रेडिमेड तर मग खातच सुटतो परिणाम असा होतो की शरीर अनेक रोगांचे माहेरघर होते शरीराला कोणताही आकार उरत नाही रस्त्याने जर चालत गेलात तर अनेक लोक दिसतील कुणाचे पोट सुटले आहे तर कुणाचा मागचा पुढचा भाग सुटलेला आहे नियंत्रणाच्या बाहेर गेलेले शरीर दिसते धड चालता येत नाही उठता येत नाही की बसता येत नाही जिणे चढतांना धाप लागते व एक दिवस हार्ट काम करायचे बंद करते कारण शरीराला कधी व काय खाणे लागते याचा कधी विचारच केला नाही जे दिसेल ते खातच सुटलो त्यामुळे शरीर आवाक्याच्या बाहेर गेले व त्याच्या तक्रारी सुरू झाल्या वजन पेलेनासे झाले व त्या वजनामुळे रक्तदाब हार्टअॅटेक तसेच अनेक प्रकारच्या रोगांनी शरीरात प्रवेश केला व कधी केला हे समजलेच नाही कारण मनाला एवढी सवय लावून घेतो आपण की चहा घेतला तरच फ्रेश वाटते व मग दिवसातून किती चहा घेतो त्याचा अंदाजच नसतो बाहेरचे खाल्याशिवाय मजाच येत नाही मग मन बाहेरचे खाल्याशिवाय स्वस्त बसू देत नाही माणूस दुसर्‍यावर विजय मिळवतो पण स्वत:वर नाही मिळवता येत ज्या वाईट सवयी लावून घेतलेल्या असतात त्यातील एक जरी सवय कायमची सोडली तरी  खूप झाले व अशा रीतीने हळूहळू एक एक सोडत  जा.कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक आहे पण फालतू गोष्टीमध्ये माणूस आपली उर्जा खर्च करत असतो याला धडा शिकवं त्याला शिकव पण स्वत:लाच धडा शिकवला पाहिजे पण स्वत:कडे बघायला नजर नसते .समोर चिकन बाजूला बियर किंवा दारू हातात सिगारेट व मित्रांबरोबर रंगली अशी पार्टी म्हणजेच जीवनात मजा करतो आहोत असे समजणे म्हणजे अज्ञानच होय अशा पार्टीचीच सवय लागते व घरचे जेवण गोड लागत नाही त्यामुळे शरीर व मन दोन्हीही रोगीष्ट होतात व मनाचे व शरीराचे आजार जडतात म्हणून कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञानअसले की अंधारात चाचपडणे थांबते व ते ज्ञानच आपल्याला चांगला व वाईट मार्ग दाखवते म्हणून विचार करा  व द्या शरीराला रोज निदान एक तास तरी.मग फायदाच फायदा बघा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...