सुट्टी
सुट्या लागल्या सुट्या लागल्या
करायला पाहिजे काहीतरी नवीन
नुसतचं वेळकाढूपणा नको
करू या सुट्यांचे नियोजन
घरात करू या साफसफाई
एकवटू या सारे बळ
बोलू लागेल आपल्याशी घर
जाईल छान आपला वेळ
जाऊ या लांब कुठेतरी फिरायला
गप्पागोष्टीने करू या मोकळे मन
मनात साठलेले काढू या बाहेर
मग वाटेल स्वत:लाच प्रसन्न
योगा व्यायाम चालणे करून
मजबूत निरोगी करू या शरीर
आहारावर ठेवून नियंत्रण
आजाराला करू शरीराच्या बाहेर
घेऊ या मित्र नातेवाईकांची भेट
वाटू या त्यांच्यात खूशी
होतील घट्ट बंध नात्यांचे
वादविवाद नकोत कुणाशी
डोळे मिटून शांतीत
करूया स्वत:शी संवाद
होईल आपली स्वत:शीच ओळख
तेव्हा होईल आपल्याला परमानंद
नियोजन करू या खर्चाचे
तेव्हा जाईल वर्ष चांगले
वायफळ खर्चावर येईल नियंत्रण
वाटेल स्वत:लाच तेव्हा चांगले
ज्यांना गरज आहे आपली
त्यांच्यासाठी जाऊ या धावून
सुट्यांचा उपयोग आपल्याबरोबरच
लोकांसाठी बघावे जगून
वाचन लिखाणाला भरपूर देऊ
दिवसाचा अमूल्य वेळ
घरच्यांबरोबर राहून
मिळू या मानसिक बळ
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment