खरा मित्र
खरा मित्र जर कुणी असेल आपला तर आपला सकारात्मक दृष्टिकोन .प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार केला की मग त्रास होत नाही .सगळीकडे चांगले दिसायला लागते परिस्थितीही कितीही विपरीत असली तरी त्यातून चांगले घेण्याची दृष्टी निर्माण झाली की मग वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही .लहाणपणी जेव्हा काका मामा व अजून कुणी नातेवाईक आपल्याला मदत करत नाहीत तेव्हा आपल्या मनात राग निर्माण होतो पण त्यांच्या नकारामुळे आपण धडपड करतो आपली क्षमता वाढते परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी व स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम होतो आणि आपल्याला सक्षम करण्यासाठी वरील लोकांचा नकारच कारणीभूत होतो म्हणून त्यांच्याप्रती आभारच व्यक्त केले पाहिजेत प्रत्येक वाईट प्रसंगात चांगलेही दडलेले असते व ते चांगले बघण्याची नजर निर्माण झाली पाहिजे म्हणून सकारात्मक विचार हेच आपले मित्र असतात व प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतात व कठीण प्रसंगातही ते आपल्याला धीर देतात एक सकारात्मक विचार हजारो नकारांना मारून टाकतात व मनाला विपरीत परिस्थितीतही मनाला शांत ठेवतात. सकारात्मक विचाराने रागाची सुट्टी होते मन शांत असते आणि मन शांत असले की आपल्या हातून वाईट असे काही घडत नाही .आलेला वाईट काळ निघून जातो व उरतात आठवणी की आपण त्याला सामोरे कसे गेलो व आज त्यावर मात करून लढाई जिंकली व ती लढाई सकारात्मक विचारानेच जिंकता येते. आपल्याकडे असे विचार असतील तर हजारो माणसे आकर्षित होतात व ते ही तसा विचार करू लागतात म्हणून आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू असतो मग आपणच ठरवायचे की मित्र बनायचे की शत्रू .एक सकारात्मक विचार असा की जे आज दिसते ते उद्या राहाणार नाही जे दिसते ते तेवढ्यापुरते खरे भासते मृगजळा प्रमाणे पण खरे वेगळे असते आणि ज्या दिवशी खर्याची जाणीव होईल त्या दिवसापासून एकही नकारात्मक विचार येणार नाही माणूस आपल्याच मस्तीत मस्त राहणार सुख दु:ख हे असे काहीच नसते ते फक्त विचारांवर अवलंबून असते किंवा ती मनाची स्थिती असते म्हणून बघूया आपल्याला स्वत:चा मित्र होता येते का ?प्रयत्न करून बघूया .जमतं का बघू
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment