राग
राग धरावा आपल्या माणसांवर
पण कधीच नाही जावे त्यांच्यापासुन दूर
येतो कधीकधी आपल्या मित्रांचा राग
पण त्यामुळे काढू नये दुसरा माग
झाले गेले काका विसरुन जाऊ
आपण सारे आहोत एकमेकांचे भाऊ
हक्काने मी रागवलो होतो तुमच्यावर
कारण तुमच्या प्रतिक्रियेने दुखावलो गेलो फार
अपेक्षा नसते माणसाची अशी कुणाकडून
दुखावले जाते मात्र आपुले मन
झाले गेले ते गंगेला मिळाले
स्वच्छ मन मात्र माझे झाले
आपण सारे मित्र धर्मामुळे जमलो
राग धरून मी मात्र दमलो
लटिका होता राग माझा
आता मात्र झालो ताजा
तुमच्याबद्दल आहे प्रेम सदा
छोट्या गोष्टीने नाही होणार कमी कदा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment