आपले शरीर व देश
देश व शरीर यांची तुलना केल्यास असे दिसून येईल की दोघांची स्थिती सारखीच .देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फौजा तयार ठेवाव्या लागतात .डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते .प्रत्येक भाग हा देशाचा महत्वाचा असतो .तर काही भागावर जास्त सुरक्षा ठेवावी लागते पण काहीवेळा कितीही सुरक्षा असली तरी शत्रू बेसावधपणे हल्ला करतो व देशाला हानी पोहचवतो .कमकुवत सुरक्षा यंत्रणा असली की मग कुणीही केव्हाही येतो व घातपात करून जातो पण बलाढ्य यंत्रणा असली की मग शत्रूचा नाईलाज होतो तसेच शरीराचेही आहे जर आपले शरीर कमकुवत असेल तर नेहमीच रोगरूपी शत्रू आपल्यावर मात करतात कारण शरीरात जी प्रतिकारशक्ती आहे तीच काहीशी कमकुवत झाली असते म्हणून रोग सहजच प्रवेश करतात. जरा काही थंड पदार्थ खाल्ला की लगेच सर्दी मग खोकला व नंतर ताप यायला सुरवात होते कारण शरीरात प्रतिकार शक्तीच नसते .कुठे बाहेरगावी पाणी घेतले की लगेच पोटाचे विकार सुरू होतात .बाहेर थोडे फिरायला गेलो की लगेच मलेरिया डेंगू यासारखे आजार होतात म्हणजे शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जे खायला पाहिजे ते आपण घेत नाही कष्टांच्या कामाची सवय नसते योगाभ्यास होत नाही चालणे फिरणे होत नाही खाण्याच्या पद्धती चुकीच्या वापरतो शुद्ध वातावरणात कधी फिरायला जात नाही .नको ते नकारात्मक विचार घेऊन फिरत असतो . राग द्वेषाने मन मलिन झालेले असते अशा सर्व गोष्टींमुळे शरीरातली प्रतिकार शक्ती म्हणजेच संरक्षण यंत्रणा खिळखिळीत झाली त्यामुळे रोगाचे राक्षस सहजच आपल्या शरीराची तटबंदी भेदून आत सहज प्रवेश करतात व आपल्यावर ताबा मिळवतात म्हणून देश असो की शरीर यांचे संरक्षण करण्यासाठी आतील यंत्रणा फार मजबूत असली पाहिजे जेणेकरून शत्रूला आत घुसताच येता कामा नये व घुसले तर आतील सैनिकांकडून त्यांचा पाडाव झाला पाहिजे दुर्लक्ष केल्यामुळेच रोग वाढत जातो व शरीराला संपवतो म्हणूनच दुर्लक्ष केल्यामुळेच ब्रिटिशांनी एवढे वर्ष आपल्यावर राज्य केले . देश वा शरीर विविध उपाय करून सुरक्षित झाले पाहिजे.पटतं का व बघा तटबंदी मजबूत करता येईल का?
प्रा .दगाजी देवरे
Comments
Post a Comment