शत्रू आणि मित्र
शत्रू आणि मित्र आहेत
विरोधी शब्द दोन
पण दोघांचे असते चालू
मनामध्ये आपले चिंतन
एकाच्या चिंतनाने वाटतो
मनाला भक्कम आधार
अन् दुसर्याच्या चिंतनाने
वाटते नेहमी निराधार
एकाच्या दर्शनाने दिवसाची
सुरवात होते छान
दुसर्याच्या दिसण्याने उत्साह
जातो कायमचा निघून
एकाचा सहवास आपल्याला
हवाहवासा कायम वाटतो
दुसरा येऊ नये वाट्याला
असा मनात निग्रह असतो
एकाच्या विचाराने आत
आनंदाची पहाट होते
दुसर्याच्या विचाराने मन
गटांगळ्या खायाला लागते
मित्राला बनवू नये शत्रू
अन् शत्रूला करू नये कधी मित्र
चांगल्या मित्रांपासून होऊ नये दूर
काही मित्र शत्रूपेक्षा घातक असतात मात्र
साधूसंताना शत्रू मित्र
कायम समान असतात
अशी स्थिती येणे असते अवघड
म्हणून त्यांच्याजवळ राग द्वेष नसतात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment