मौन यह बडी चीज होती है बाबू
बर्याच वेळा आपल्याला नको तेथे बोलायची खूप सवय असते जर मुद्देसूद बोलणे असले तर ठिक नाहीतर आपल्या बोलण्यातून अज्ञान बाहेर पडते व आपण उघडे पडतो म्हणून ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहीती आहे तेच बोलावे .काहीवेळा आपल्या खर्या बोलण्याने जर दोन व्यक्तींमध्ये भांडण होणार असेल तर अशावेळी माहीती असूनही त्यावेळी मौन धारण केलेलेच बरे .काहीवेळा आपल्याला एखाद्याचा प्रचंड राग येतो व अशावेळी आपल्या हातून काय विपरीत होणार याची आपल्याला जाणीव नसते तेव्हा मौन धारण केल्यामुळे पुढचे परिणाम भोगावे लागत नाही आपल्याला व समोरच्याला म्हणून मौनामध्ये प्रचंड ताकद असते जे शब्दाने घडू शकत नाही ते मौनाने शक्य होते .बर्याच घरची लक्ष्मी आपल्या नवर्याबरोबर काहीतरी कारणाने मौन धरते किंवा नवरा मौन धरतो तेव्हा त्या मौनाच्या काळात राग जाऊन आपसात प्रेम निर्माण होते .मौन करायला पण एक सिमा असावी नाहीतर मौनाचे रूपांतर कायम स्वरूपी मौनात व्हायला वेळ लागणार नाही .मौनामुळे आपल्या तोंडात आलेल्या शिव्यापासून समोरचा वाचतो व समोरच्याला आपल्या बद्दल जी इज्जत आहे ती अबाधित राहते म्हणून सारासार विचार करून वायफळ बडबड करण्यापेक्षा मौन धरावे .बर्याच वेळा समोरचा वायफळ बडबड करतो व त्या बडबडीला शब्दाने प्रतिसाद देण्यापेक्षा मौन धारण केलेले बरे जर मौनामुळे समोरचा आपला गैरफायदा घेत असेल तर मौन सोडून त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे म्हणून मौन कुणापुढे धरावे व कुणापुढे नको हे अनुभवाने आपल्याला चांगलेच परिचित येईल.आपल्या मौनाने समोरच्याचे व आपले फार नुकसान होणार नाही व शेवटचा परिणाम चांगला झाला तर ते मौन सर्वश्रेष्ठ मौन म्हणता येईल.त्यामुळे समोरची परिस्थिती व आपल्या मनाची अवस्था यावर मौन धरावे की नको हे ठरवता येईल. बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment