Skip to main content

घेर पोटाचा

पोटाचा घेर

जिकडे तिकडे नजर टाकली तर सगळ्यांचा पोटाचा घेर  वाढत चालला आहे एकदा तो वाढला की कमी होण्याचे नावंच घेत नाही व त्या घेरमुळेच माणूस ओबडधोबड दिसू लागतो माणसामधील जी सुंदरता असते ती त्या पोटाच्या घेरमुळे नष्ट होते त्या घेरमुळे कपडे अंगाला व्यवस्थित बसत नाही. चालतांना झोपतांना बसताना त्रास होतो. कुठे प्रवास करणे म्हटले की त्या घेरमुळे जास्त धावपळ करणे जमत नाही कुठे पायर्‍या जिणे चढायला त्रास होतो तसेच गुडघ्यांवर त्याचा ताण पडतो म्हणून गुडघे दुखी सूरू होते श्वास घ्यायला त्रास होतो जरा चाललं की दम लागतो व वय कमी असले तरी पोटाच्या घेरमुळे वयस्कर दिसू लागतो .माणूस संपती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो पण ज्या संपतीचा उपभोग घेण्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते त्याकडे दुर्लक्ष करतो .कधी ढेरी एवढी वाढली ते ही लक्षात येत नाही कचर्‍याच्या कुंडीप्रमाणे जे दिसेल ते वेळ काळ न बघता माणूस पोटात ढकलत असतो त्यामुळे कणाकणाने ते पोट वाढत जाते व ते वाढलेले पोटच रोगांचे निमित्त बनते म्हणून मनात ठाम निश्चय करून आहारावर नियंत्रण तसेच पोटाचे व्यायाम कपाल भारती चालणे असे प्रकार केल्यास त्या ढेरीवर नक्कीच नियंत्रण येईल व वाढत्या वयात तरूण झाल्यासारखे वाटेल व काम करताना आळस दमायला झाल्यासारखे वाटणार नाही  . हा लेख वाचल्यावर जरा आपल्या पोटाकडे लक्ष द्या व बघा तुमचे पोट  सुटलेले आहे का व असेल तर या क्षणापासून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करा व ते जमेलच असा ठाम निश्चय करा .केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे  किंवा यत्न तोचि जाणावा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...