दोन तारखा
एक तारीख असते जन्माची
तिने सुरू होतो जीवनप्रवास
दुसरी तारीख असते मरणाची
तिने समाप्त होतो एकूण प्रवास
लोकांना रस असतो
फक्त दोन तारखांचा
कधी आले होते जन्माला
अन् खंडीत कधी झाला प्रवास इहलोकीचा
काहीचे अंतर खूप असते
त्या दोन तारखांत
लोकांना लक्षात राहील
असे काहीतरी करून जातात
दोन तारखांमधील अंतराला
म्हणतात जीवन
काही खूप कष्ट करतात
पण राहून जाते मात्र जगणं
दोन तारखा कुणालाही
चुकल्या नाही कधीच
जन्माची तारीख आली
की शेवटची तारीख येतेच
दोन्हीही तारखा नसतात
कधी आपल्या हातात
जरी त्या आपल्याच असल्या
तरी कुणालाच आधी कळत नसतात
तारीख पे तारीख असे
कधीच होत नाही
असतात त्या कायमस्वरूपी
त्यांच्यात बदल करणे आपल्या हाती नाही
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment