आत दडलेले खोडकर बालक
प्रत्येकजण एवढा गंभीर झाला आहे की हसायला जसा विसरूनच गेला चेहरा असा काय गंभीर असतो की सार्या जगाचे टेंशन त्याच्य एकट्यावर पडले की काय. काही लोक कधीच हसत नाही मग टेंशन असो की नसो. त्यांचा गंभीर चेहरा बघितल्यावर समोरच्याला टेंशन येते त्यामुळे त्याचाही चेहरा गंभीर होतो . म्हणून साधा प्रश्न असेल तर त्या गंभीर चेहर्यामुळे अजून कठिण होतो व एकूणच वातावरण गंभीर होते त्यामुळे मला असे वाटते की प्रत्येकाच्या आत जे बालक दडलेले आहे त्याला कायम जिवंत ठेवले पाहिजे त्यामुळे कठिण प्रश्न सोपे होतात .आपल्या हसण्याने समोरचा टेंशनमध्ये असेल त तो ही रिलॅक्स होतो व टेंशन थोड्या वेळेसाठी विसरतो .त्या गंभीरतेमुळे आपण मनसोक्त खाऊ शकत नाही लोक काय म्हणतील या भीतीने कृत्रिमपणा आणतो .एखाद्या लग्नात आतील बालक आपल्याला नाचायला सांगते पण आपण तर गंभीर मग कसे नाचायचे .चालतांना गंभीर बोलतांना गंभीर. काम करतांना गंभीर आपण हसून कुणाचे स्वागत केले किंवा दिसल्यावर smile केले की आपले महत्व कमी होणार की काय असा गैरसमज त्यांच्या मनात असतो. असे लोक लहान होते का बालकासारखे कधी असा प्रश्न निर्माण होतो .कधी लहानपणी हसले असतील का? अशा गंभीर माणसापासून लोक लांब राहतात म्हणजे अंतर ठेऊन असतात त्यांच्या गंभीर राहण्याने प्रश्न कठिण होत जातात. पुढे पुढे अशा लोकांच्या तब्बेतीच्या तक्रारी चालू होतात. अनेक मानसिक ताण त्यांच्यावर विराजमान होतात न्यूनगंड अशा लोकांमध्ये निर्माण होतो. वातावरण हलकंफुलकं राहत नाही म्हणून गंभीरता सोडून हसायला पाहिजे मनमोकळेपणाने .आतील बालक जिवंत झाले पाहिजे मग बघा कसं छान वाटेल.मन कायम आनंदीत असणार व कोणता मानसिक तणाव जाणवणार नाही लोक जवळ येणार .मित्र वाढणार मग जगायला हूरूप येईल घरातील माणसेही आनंदीत होतील व कठिण गोष्ट एकदम सोपी होणार .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment