जीवन हे मृत्यूच्या आधी पडलेले स्वप्न
एका रात्री एकाला स्वप्न पडले की एका हाॅटेलात तो जातो तेथे त्या दिवशी फ्री जेवण असते पण लाजाळूपणामुळे त्याने काही खाल्ले नाही नंतर एका कपड्याच्या दुकानात जातो तेथे सेल लागलेला असतो पण शंका घेतल्याने एवढे चांगले कपडे असूनही त्याने घेतले नाहीत .स्वप्नात हे ही बघितले की आपण मोठे अधिकारी झालोत व भरपूर भ्रष्टाचार केला .लोकांना त्रास दिला. मग हे सारे स्वप्नात बघत होता जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा त्याला वाईट वाटले व विचार केला की स्वप्नात एवढ्या चांगल्या संधी होत्या व जर ते स्वप्नच होते तर आपण का नाहीआनंद घेतला भरपूर खरेदी केली असती हाॅटेलमध्ये पोट भरून जेवण केले असते .अधिकारी असल्याने लोकांची सेवा करायची संधी का साधली नाही .भरपूर लोकांना मदत केली असती पण हे सारे जागे झाल्यानंतर सुचायला लागले मग जीवन हे मृत्यू येण्याआधी पडलेले एक स्वप्नच तर आहे म्हणून कंजूषी न करता भरपूर हसा .जीवनाचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीतूनही मिळवता येतो तो मिळवा मनासारखे जगा . दुखी कष्टी न होता मार्ग काढा .चांगल्या गोष्टी करायला लोकांची का म्हणून लाज बाळगायची .मी कुणीतरी मोठा आहे हा अहंभाव सोडून सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागा .एकमेकांना मदत करा व हे सर्व करत असतांना लक्षात ठेवा की जीवन हे मृत्यूच्या आधी पडलेले स्वप्न आहे आपण ते खरे मानून चालतो म्हणून तर वाईट गोष्टी घडत असतात .क्षुल्लक गोष्टीसाठी लोक मारामारी खून करतात कारण त्यांना जाणीव नसते की जीवन हे मृत्यूच्या आधी पडलेले स्वप्न आहे. पण काहीजण मृत्यूला स्वप्न समजतात व जीवनाला स्थिर म्हणून गोंधळ उडतो .प्रत्येकाला ह्या स्वप्नाच्या जगातून जावंच लागते .खर्या गोष्टीचा कधीही विनाश होत नाही .ज्याचा विनाश होतो ते स्वप्नच.काही गोष्टी स्वप्न असतात पण आपण खरे मानून चालतो व तेथेच फसतो .हे विचार पचवणे फार कठिण आहेत पण सत्य मात्र आहेत हे नक्की.
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment