बाकी बरं आहे
नाही तब्बेत माझी बरी
झाला होता माझा अपघात
होत होता भरपूर त्रास
पडलो होतो भर रस्त्यांत
पण बाकी बरं आहे
मुलगी झाली दहावीला नापास
घरात वाढले भरपूर टेंशन
मुलगा झाला नुसता पास
मोठे करावं लागलं मन
पण बाकी बरं आहे
कंपनीला लागले टाळे
आर्थिक टंचाईचा करतो सामना
महाभाईचा उडतो आहे भडका
कसं जगावं हेच कळेना
पण बाकी बरं आहे
राहायला नाही स्वत:चे घर
मिळत नाही नवीन नोकरी
झालो आहे जीवनात बेजार
मोबाईल मागते आहे छोकरी
पण बाकी बरं आहे
पाऊसाने दिली हुलकावणी
बघतो आहे त्याची वाट
शेतात नाही झाली पेरणी
कोरड्या झाल्या विहिरी अन् पाट
पण बाकी बरं आहे
घरात नाही दाणा
पोटाला नाही मिळत भाकरी
विचार करून झाले डोकं जड
कुणी देत नाही चाकरी
पण बाकी बरं आहे
रोजचं जगणं झालं जड
दिवस सरता सरत नाही
उरले नाही कोणते स्वप्न
नशिबात नाही राहिले काही
पण बाकी बरं आहे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment