नवरात्र
हे माता करतो आम्ही तुझे स्वागत।
वाजत गाजत आणतो तुला नगरात।।
तुझ्या येण्याने आले आम्हाला हत्तीचे बळ।
वाईट विचार काढतील मनातून आता पळ।।
आता कर तू दृष्टांचा नायनाट।
नको बघू आता कशाची वाट।।
भ्रष्टाचार अत्याचारने गाठला आता कळस।
तू काहीतरी करशील असे वाटते आम्हांस ।।
कर स्थापित शांतता समाजात।
अन् उत्साह येऊ दे सगळ्यांच्या मनात।।
आम्ही तुझीच लेकरे सारी।
तुझ्यामुळे येईल आम्हांला उभारी।।
होईल तुझा उदो उदो उद्यापासून।
करतील तुझे रात्रंदिन भजन।।
गरब्यात होतील सर्वजण दंग।
गातील तुझेच सारेजण अभंग।।
दिसतील नऊ रंग नऊ दिवसाचे।
साजरा करतील सर्व दिवस उत्सवाचे ।।
कधी होते तू चंडिका तर कधी होते लक्ष्मी।
तू आलीस म्हणून निर्धास्त झालो आम्ही।।
जय जय माता तुला शतश: प्रणाम।
कृपा असू दे जनतेवर तमाम।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment