एकट्या राहणार्या व्यक्तींचा सोबती
गावाकडे किंवा शहरात जर फेरफटका मारला तर असे दिसून येईल की बरेच लोक एकटे राहतात काहींचे मुले परदेशात नोकरीला असतात तर काहींचे मुले शहरात नोकरी निमित्ताने गेलेली असतात किंवा काहींचे सूनेशी मुलांशी पटत नाही असे असंख्य कारणे आहेत एकटं राहण्याचे अशावेळी त्यांची कुणी सोबत करत असेल तर टी व्ही वरच्या मालिका त्या मालिकांची वेळ संध्याकाळी सहा पासून सुरू होते व रात्री दहा साडेदहा पर्यंत चालतात कौटूंबिक असतात त्यामुळे मराठी सिरियल आपल्या घरातल्या वाटतात त्यामुळे एकटे राहणारे लोकं एवढे रमून जातात त्यांच्यामध्ये की ते सगळे एकटेपण विसरतात मग बातम्याकडेही लक्ष असते कुठे काय चालू अहे तरुण लोकांसाठी टीव्ही मोबाईल शाप आहे पण अशा एकटे राहणार्या लोकांचा तो एक कुटूंबाचा एक मेन सदस्य झाला आहे त्यामुळे त्यांचे आयुष्य आनंदी झाले आहे व जगण्याला हुरूप आला आहे . एखाद्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू झाला की मगएकटेपण त्यांना नकोसे वाटते शहरातही बरेच एकटे राहणार्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे टी व्ही त्यांचा एकटेपणा काही प्रमाणात दूर करतो म्हणून टी व्ही हा टाईमपास नसून त्यांना जगण्याचे आनंदी राहण्याचे साधन बनला आहे तसेच एकवेळ नातेवाईक लोकांचे नाव विसरतील पण सिरियलमधील लोकांचे नाव कधीही विसरत नाहीत त्यामुळे एकटे राहणार्या लोकांना किंवा दमून थकून आल्यावर थकवा जाण्यासाठी टी व्ही चा आधार घेतला जातो व फ्रेश होऊन जातात थोड्या वेळेसाठी टेंशन विसरून जातात म्हणूनच अशा लोकांसाठी टी व्ही हा वरदानच ठरला गेला आहे .खोटे वाटत असेल तर सर्वे करा व मग मी काय सांगतो ते पटेल .बघा पटतं का
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment