एक चुक
प्रत्येकजण जीवनात काही तरी चुका करत असतो काही चुका सौम्य असतात तर काही चुकांची फार मोठी किंमत मोजावी लागते बर्याच वेळेला शिक्षणाचा मार्ग चुकतो व वेळ निघून गेलेली असते व तो दुरूस्त करणे अशक्य असते काहीवेळा घर घेताना निर्णय चुकतो मनासारखे घर घ्यायचे असते पण कुणाच्या तरी नादी लागून चूक करतो व नको ते घर पदरात पडते काहीवेळेला मित्र निवडतांना चूक करतो कारण काहीवेळेला मित्रांच्या व्यसनामुळे स्वत:ला व्यसन लागते व ते सुटता सुटत नाही व त्या पार्टीत छोटीशी चूक होते व व्यसन कायमचेच लागून जाते बर्याच जणांना लग्न करतांना छान वाटते पण बरेच वर्ष निघून गेल्यावर त्यांना चूक वाटायला लागते काही मात्र खोट्या भूलथापांना बळी पडतात व चूक करतात काहीवेळा सरकारी आॅफिसमध्ये कुणाच्या तरी नादी लागून लाच स्विकारतात व पकडले गेल्यावर कळते की चूक झाली व त्या चुकीची शिक्षा फार चुकवावी लागते काही व्यवहार करताना चूक होते व पश्चातापाशिवाय हातात काहीच नसते काही चुका दुरूस्त करता येतात पण काही मात्र कधीच दुरूस्त करता येत नाहीत काहींची छोटीशि चूक माणसाला अधोगतीला नेते पण काही चुकांपासून बोध घेऊन माणूस आरपार बदलून जातो चुका याच गुरू असतात त्यातून चांगलाच धडा घेतो व सावध होतो पण काही मात्र त्यातून काहीच बोध घेत नाही. विचार करा तुम्हीही काही चूक केली आहे का व तिचे परिणाम जाणवतात का की त्यातून सावध होऊन जीवनात यशस्वी झालात.जय श्रीकृष्ण
प्रा दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment