जग काय ओसचि पडले
किती आले अन् किती गेले
गणती नाही कुणी केली
चालूच आहे जगाचे रहाटगाडगे
त्यांच्याविना कुणाचे कामं राहिली
आले ते गेले निघून
राहिल्या काहींच्या आठवणी
उमटवला त्यांनी कार्याचा ठसा
गवसनी घातली त्यांनी गगनी
त्यांच्यामुळेच चाखतो आपण फळं
त्यांच्या कष्टांच्या घामातून आलेली
खर्चि घातले त्यांनी आपले आयुष्य
सुखं सारे त्यांचे वाहून गेली
गायब झाले ते पडद्याआड
कुणालाच कधी न दिसण्यासाठी
अचानक विझला त्यांच्यारूपी दिवा
गेले ते कधीही परत न येण्यासाठी
कुठून आले व कुठे गेले
हे नक्की येत नाही सांगता
जगाचे काही नाही बिघडत
रोजचे व्यवहार चालू आहेत न थांबता
कुणाला नाही कोणती खंत
कारण खंत करून उपयोग नाही
काही केले तरी गेलेले माणसे
परत येऊ मात्र शकत नाही
चालला हा खेळ अनेक युगांपासून
थांबायचं घेत नाही नाव
का खेळला जातो हा खेळ
कुणाला कळायला नाही वाव
दिवसा मागून दिवस जातात
येतात माणसांमागे माणसे जन्माला
कोण खेळवतो हा नक्की खेळ
त्याची ओळख नाही कुणाला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment