सुशिक्षित अडाणी
माझा फार मोठा गैरसमज होता की शहरात राहणारे लोक किती शिस्तिने वागतात छान मोजके बोलत असतील शिव्या हा प्रकार कदाचित माहीती नसेल. जरी राग आला तरी सभ्य भाषेत तो व्यक्त करत असतील .मुले तर एकदम हुशार असतील काॅपी हा प्रकार चालत नसेलच अशा कल्पना मी खेडेगावात राहून करत होतो व स्वत:ला कमी लेखत होतो पण शहरात आल्यावर मला धक्का बसला .इकडची काही मुले फार बेशिस्त आहैत .परिक्षेमध्ये सुपरवायझरचे लक्ष नसेल तर याचा पेपर बघ त्याचा बघ याला विचार त्याला विचार असले प्रकार करताना दिसतात लेक्चर प्रात्यक्षिक बुडून मोबाईलवर time pass करताना दिसतात .कोणत्याही भविष्यांची चिंता नाही .बापाच्या पैशावर मजा मारणे एवढंच माहीत असते व शिव्या तर विचारू नका आई बहिणीवरून तर एकमेकांना तर सहजच शिव्या देतात .बोलता बोलता एक मिनिटात कितीतरी शिव्या तोंडात त्यांच्या येत असतात तसेच सुशिक्षित लोकही सर्रास शिव्या देतात .त्यांचा रागाचा बिंदू एवढा वरती असतो की सहन करण्याची शक्ती त्यांच्यात दिसत नाही म्हणून त्यांना सुशिक्षित अडाणी हेच म्हणावसं वाटते शिक्षण घेतले ते फक्त पैसा कमवण्यासाठी बाकी गोष्टी हे ते शिकलेच नाही त्यापेक्षा वाटते खेडेगावातील न शिकलेले लोक बरे. काहीजण फार अभ्यांस करतात व परिक्षेमध्ये चांगले मार्कस मिळवतात व मोठमोठ्या पदांवर विराजमान होतात तसेच उद्योगधंद्यामध्येही उंची गाठतात व त्यांचे वागणे अत्यंत आदर्श घेण्यासारखे असते पण हे प्रमाण फारच कमी आहे शहरात खेड्यातून आलेले लोक शिक्षण घेण्यासाठी येतात तसेच नोकरी करण्यासाठी व असे असभ्य वर्तन करताना दिसतात .सगळेच असे वागतात असे नाही पण बरेच प्रमाण आहे काही मात्र शिकलेले असतात व तो सुशिक्षितपणा त्यांच्या बोलण्यातून वर्तनातून कळतो .किती नम्रपणाने त्यांचे वागणे असते मुद्देसुद बोलणे असते समोरच्याला न दुखावता काम करून घेण्याची तसेच काम करायची हातोटी असते .शिक्षणाचा खरा अर्थ त्यांच्या वर्तनातून कळतो व अशा लोकांमुळेच समाज देशाची प्रतिमा उंचावते व अशा लोकांचे गुणही न शिकलेल्या काही लोकांमध्ये दिसून येतात पण ते प्रमाण कमी असते अशा लोकांचा आदर्श ठेवून तसे वागायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे तरच शिक्षणाचा उद्देश सिद्ध होऊ शकेल .बघूया जमतं का
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment