जीवनाचे सत्य व वेळ
जीवन जगत असताना आजूबाजूची परिस्थिती घरातील वातावरण याचा आपल्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो तसेच शिक्षणामुळे आपल्यात आमुलाग्र बदल होतो मग जवळ पैसा सत्ता असली की मग अजूनच स्वभावात बदल होतो बोलण्याची भाषा बदलते .काहींना पायी जाणारे माणसेच दिसत नाही तसेच सामान्य माणसांशी आपुलकीने बोलावे असेही त्यांना कधी वाटत नाही माझ्यासारखा म्हणजे मीच असे वाटू लागते नम्रपणा हा कधीच लांब गेलेला असतो आजूबाजूचे लोक म्हणजे कसपटासमान असे वाटू लागते पैसा फेकला की कामं होतात असे वाटू लागते स्वत:च्या सत्तेचा वापर करून अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य होतात त्यामुळे एक गुर्मी तयार होते .गर्व निर्माण होतो असे करता करता अनेक वर्ष निघून जातात .जीवनाचे सत्य समजण्यासाठी वेळच नसतो मग एक दिवशी काहीतरी शरीराच्या तक्रारी सुरू होतात व डाॅक्टरकडे जातात मग डाॅक्टर सांगतात थोड्याच दिवसाचे सोबती आहात हे ऐकून पायाखालची जमीनच सरकते व एवढे वर्ष बाळगलेला अहंकार गर्व क्षणात गळून पडतो व भाषेमध्ये मृदूपणा येतो .लांब गेलेला नम्रपणा जवळ येतो .लोकांशी बोलावे त्यांना मदत करावी घरातील मंडळींना वेळ द्यावा साधे जीवन जगावे रस्त्यावरचा चहा घ्यावा मित्रांबरोबर हसावे असे वाटायला लागते पण वेळ निघून गेलेली असते .समोर मृत्यू दिसायला लागतो व एवढे वर्ष आपण वागलो त्याचा त्याला पश्चाताप यायला लागतो कारण त्याला जीवनाचे सत्य आता समजलं असते पण त्याचा काहीही उपयोग नसतो कारण ती वेळ आता फार थोडी राहिलेली असते आता सगळी संपती नोकर चाकर गाड्या मुले बाळे सत्ता असूनही त्याचा गर्व त्याला नसतो त्यांचा विचारही नसतो . त्याला समोर यमदूत दिसत असतो पण जर का जीवनाचे सत्य आधीच समजले तर किती मजेत जीवन जगता येईल व जीवनाच्या शेवटी पश्चातापाची भावनाच निर्माण होणार नाही सत्ता पैसा हे सारे जीवन जगण्याचे साधनं आहेत ते साध्य नव्हेत व त्यांचा वापर जास्तीत जास्त लोकांच्या सेवेसाठी करता आला पाहिजे तुम्ही बाॅस झालात म्हणजे लोकांना धमकवण्यासाठी वचक बसवण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी नव्हे तर त्यांची सेवा त्यांची कामं तुमच्यामुळे सहज झाली पाहिजेत तर त्या बाॅसचा खरा अर्थ आहे पण हे सत्य वेळेतच कळले पाहिजे नाहीतर सर्व असूनही खरे करायचे राहूनच गेले असा पश्चाताप नक्कीच होईल .ज्याला कळले तो जीवनात तृप्त होतो नाही कळले तर मात्र सर्व राहुनही शेवटी कोरडाच राहतो.बघा पटतं का
प्रा दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment