सारखाच न्याय देवाचा
आपण पेपरमध्ये टीव्हीच्या बातम्यांमध्ये बघतो की करोडपती लोक आपल्या लग्नांच्या समारंभामध्ये पैशांची किती उधळपट्टी करतात व का करू नये कारण त्यांनी कष्टांचा पैसा कमवलेला आहे पण अशी उधळपट्टी करून तो पैसा वाया जातो. आता कुणी म्हणेल त्यातून त्यांना आनंद मिळाला व आनंद पैशावर तोलता येत नाही पण एकीकडे शेतकरी कष्टकरी जनता दुष्काळाने होरपळून निघाली आहे अशी उधळपट्टी कमी करून जर शेतकर्याचे कर्ज लग्नाच्या निमित्ताने माफ करून टाकले असते तर कितीतरी शेतकर्यांचे वाहणारे अश्रू थांबले असते व त्यांची दुवा एवढी मिळाली असती की त्याची तुलना कशानेच करू शकत नाही व एक इतिहास रचला गेला असता आता अशा मोठ्या लग्नांमध्ये त्यांच्याच लेवलचे लोक जातात म्हणजे ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांनाच पाहूणचार द्यायचा म्हणजे भरलेल्या पोटाला अजून भरायचे व गरीब जनतेने फक्त बातम्या बघत बसायचे व इकडे तिकडे फोटो पाठवायचे .पण देवाने एक न्याय चांगला केला आहे अब्जाधीश असेल तरीही त्याला सामान्य माणूस मरतो तसेच मरण येते व सामान्य माणसाची जशी शेवटी राख होते तशीच त्यांचीही होते तसेच सामान्य माणसाला 100 वर्ष आयुष्य पकडले तर अब्जाधीश वाल्यांनाही तेवढेच आयूष्य असते किंवा कमी असते .पैसा असला म्हणून काय अमरत्वाचा पट्टा घेऊन येत नाही . जेवढी झोप आवश्यक आहे तेवढीच त्यांनाही झोप घ्याविच लागते. जेवढी सामान्य माणसाला झोपायला जागा लागते तेवढीच त्यांनाही लागते. आता बिछानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण एकवेळ छान बिछानावर झोप येईलच सांगता येत नाही पण सामान्य माणूस जमीनीवरही चांगली झोप घेऊ शकतो लाखो रूपये देऊन झोप विकत घेऊ शकत नाही जेवढी हवापाणी आवश्यक आहे तेवढी दोघांना समान लागते व ते सगळिकडे उपलब्ध आहे एवढी सारी समानता नियतीने दिली ते बरे झाले व मृत्यूनंतर गरीबातला गरीब माणूस व अब्जाधीश कुठे जातात ते कुणालाच सांगता येत नाही पण जातात मात्र एकाच वाटेने ते म्हणजे कधीच परत न येण्याच्या पण ज्याचा त्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो व त्यापद्धतीने माणूस वागत असतो व जगत असतो
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment