तीन तिघाडा काम बिघाडा
तीन जण एकत्र चालले तर काम होणार नाही असा गैरसमज समाजात रूढ झाला मग त्यावर उपाय म्हणजे काही एक दगड उचलतात व आपल्या बरोबर ठेवतात व मानून चालतात की तो चौथा आहे व आपले काम होणार पण निसर्गामध्ये अनेक झाडांना तीन तीन पाने येतात म्हणून म्हणतात पळसाला पाने तीनच तसेच असेही म्हणतात की ब्रम्हा विष्णु व महेश हे तीन जगाचे काम बघतात मग हे तीन असल्यामुळे काम बिघडत नाही का तसेच सध्या तर नवरा बायको व मुलगा किंवा मुलगी बर्याच घरात दिसतात मग त्यांचा संसार बिघडतो का?रिक्षालाही तीनच चाके असतात मग तिच्यात बसणे तुम्ही सोडता का? सूर्य पृथ्वी व चंद्र या तिन मिळूनच ग्रहणाचा थरार आपण बघतो यावरून तीन गोष्टी एकत्र आल्या की वाईट घडते असे म्हणने चुकीचे आहे .डाॅक्टरही औषधं देतांना सकाळ दुपार व संध्याकाळ असे तीन वेळा घ्यायला सांगतात मग काय तुम्ही दोनच वेळा घेता का?हे सर्व मनाचे खेळ असतात त्यामुळे विज्ञान युगात तरी असे मानू नये काहीवेळा कावळा बसायची घाई व फांदददी तुटण्याची वेळ एकच होते त्यामुळे तीन असतांना योगायोगाने काही वाईट घडले की आपण ठाम होतो तीन असल्यामुळेच हे झाले .असं काहीही नसते क्त मनच्या समजूती असतात त्या.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment