Skip to main content

वयस्कर माणूस

वयस्कर माणसांची व्यथा

आपण जर बघितले तर काही घरात बरेच वय झालेले माणसे असतात .वय झाले तरी ते कामं मात्र करतात त्यांना बसणं आवडतं नाही शरीरानेही धडधाकट असतात तरुणांना लाजवेल असा उत्साह असतो नव्वदी पार केलेले लोक स्वत:ची कामं स्वत:करतात पण काही घरात मात्र परिस्थिती वेगळी दिसते  ज्या माणसाने कुटुंबासाठी सारी हयात घालवली. मुलांसाठी हाडाची काडे केली त्या माणसाला म्हातारपणी  आजारांनी घेरलेले दिसते कुणाला हार्टचा आजार तर कुणाला पॅरालेसिस झालेला असतो कुणी बेडवर अनेक वर्षापासून पडलेले दिसतात. मुलांचा आपल्या आईबाबांवर प्रचंड जीव असतो पण त्यांचे असे हाल त्यांना बघवत नाही काय करावे तेच त्यांना समजत नाही मग नोकरी कामधंदा हे सर्व सांभाळून त्यांचेकडे बघणे ही तारेवरची कसरत करावी लागते  काही ठिकाणी तर आईबाबांची आजारपणात सेवा करण्यात एवढे वर्ष निघून जातात की लग्नाचे वय उलटून जाते मुलामुलींचे व असेच लग्नाविरहित राहतात असे दृश्यही काही ठिकाणी दिसते .शहरात याचे प्रमाण जास्त  दिसते व ही परिस्थिती कशी बदलावी याचे उत्तर सापडणे बर्‍याच जणांना सापडणे अवघड आहे.धरले ते चावते व सोडले ते पळते अशी परिस्थिती निर्माण होते .असे लोक जेव्हा भेटतात व व्याकुळ होऊन सांगतात तेव्हा मन फार खिन्न होते .अशावेळी धैर्याने तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो पण काहीवेळा संयमाचा बाण सुटतो व माणसे हतबल होतात आपल्याच माणसांचे हाल बघून .नियतीपण अशा माणसांची मृत्यूतून सुटका करत नाही .एक आजारी असला की सारे कुटुंबच आजारी पडते.काही ठिकाणी आपल्याच माणसांचे आजारापणात  होत असलेले हाल बघून देवाकडे मृत्यूची याचना करतात पण यम तिकडे ढूंकूनही बघत नाही .अशावेळी माणूस हरतो व दिवस ढकलण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नसतो .असे एखाद्या कुटूंबा बाबतीतच का याचे उत्तर मात्र माणसाच्या बुध्दिच्या पलीकडे आहे
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...