काळा रंग
बरेच लोक काळ्या रंगाला अशुभ मानतात ते कोणतेही काळे कपडे परिधान करत नाही तसेच निसर्गाचा विचार केला तर सगळीकडे हिरवा रंग जास्त प्रमाणात दिसतो पण माणसाच्या बाबतीत नियतीने माणसाला काळा रंग बर्याच प्रमाणात दिला आहे तसे पाहिले तर त्या ठिकाणचे वातावरण जसे आहे तसा रंग दिसतो पण काळा रंग बहूधा प्रत्येकात असतो डोळ्यात काळा रंग दिसतो केसात काळा रंग दिसतो व बोलताना आपण म्हणतो किती छान काळेभोर केस आहेत. काळे केस म्हणजे तरूणपणाचे लक्षण समजले जाते काळे केस ज्यांचे आहेत त्यांचे सौदर्य खूलून दिसते ज्यांना काळ्या रंगाचे कपडे आवडत नाही काळा रंगच आवडत नाही तरी पण ते मात्र पांढरे झालेले केस काळे करतात .जे दाढी ठेवतात व ते केस काळेभोर आहेत त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसते .गोर्या व्यक्तींना काळे कपडे अत्यंत छान दिसतात .म्हणून काळा रंग हा माणसाला एक वरदानच आहे .जे रस्ते काळ्या डांबराचे असतात ते दिसायला एकदम चकचकीत दिसतात व त्यावरून गाडी चालवतांना मजा येते.गुरूजीही काळ्या फळ्यावर पांढर्या खडूने लिहून विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्वल करतात .म्हणून काळ्या रंगाचा जय हो
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment