स्वार्थी मन ते ईश्वरी मन
एकाच कुटूंबात राहून एक जण फक्त स्वत:चा विचार करतो त्याला काय फायदा होईल किंवा त्याला आनंद कसा होईल याचाच विचार करतो त्याला कुटूंबातील व्यक्तींचे काहीही देणेघेणे नसते अशा व्यक्ती फक्त स्वत:चाच विचार करतात मग पुढची पायरी म्हणजे काही व्यक्ती फक्त आपल्या कुटूंबाचा विचार करतात कुटूंबातील लोक कसे आनंदी राहतील याचाच विचार करून कष्ट उपसतात व त्यांच्या सुखासाठी झटतात ते म्हणजेच त्याचे विश्व असते मग त्याची पुढची पायरी म्हणजे आपल्या कुटूंबा व्यतिरिक्त काही लोक बाकी नातेवाईकांचा विचार करून झटतात व त्यांच्यासाठीही धावून जातात व सुखदुखात सहभागी होतात ते ही त्याच्या विश्वात येतात मग त्यापुढे काहीजण फक्त आपल्या जातीबांधवाचा विचार करून त्यांच्यासाठी करतात मग पुढे जावून काही माणसे सर्व जातीच्या माणसांसाठी धावून जातात मग पुढे फक्त आपल्या धर्माचा विचार करतात आपल्या धर्मातील देवांना भजतात त्यांची पोथीपुराणे वाचतात बाकीच्या धर्माचे त्यांना काहीही देणेघेणे नसते त्यापुढे जाऊन काहीजण सर्व धर्मांना समान मानतात व सर्व धर्मांचा आदर करतात व माणूस म्हणून सगळ्यांकडे बघतात व माणूस म्हणून सेवा करण्यासाठी धावून जातात .त्यापुढे जाऊन काहीजण फक्त आपल्या देशाचा विचार करतात व आपल्या देशातील माणसांचाच विचार पण काहीजण त्यापलीकडे जाऊन पूर्ण विश्वाला एक कुटूंब मानतात व विश्वातील सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून झटतात त्याही पलीकडे जाऊन नुसत्या माणसांचे नव्हे प्रत्येक प्राणीमात्रांवर प्रेम व दया करतात व त्यांच्यासाठीही झटतात त्यासगळ्यांमध्ये एकच तत्व दिसायला लागते .त्याही पलिकडे जाऊन निर्जीव गोष्टीतही ते तत्व दिसायला लागते व सजीव व निर्जीव हा भाव जाऊन एकच तत्व भरले आहे असा साक्षात्कार व्हायला लागतो व सगळे भेदाभेद नष्ट होतात व एकच मन विश्वाएवढे होऊन जाते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वचि माझे घर तसेच जे जे भेटतील भूत ते ते मानिजे भगवंत तेव्हा परमेश्वराची प्रचिती येऊन मग वाटायला लागते की तो देव दुसरा तिसरा नसून मीच आहे माझ्याशिवाय दुसरा कुणीच नाही मीच सगळिकडे भरलेला आहे स्वार्थी मन जाऊन ईश्वरी व्यापक मन तयार होते तेव्हा प्रचिती येते तो म्हणजे मीच .संताच्या विवेचनातून एक विचारधारा मांडण्याचा छोटासा केलेला प्रयत्न
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment