गलती छोटी पण सजा मोठी
जीवनात बर्याच वेळा छोटीशी चूक करतो किंवा होते पण शिक्षा खूप मोठी मिळते .कधी ती जन्मठेप किंवा फाशीही असू शकते .रिक्षाने आपल्याला कुठेतरी जायचे असते तेव्हा बिल होते 58 रूपये आपण 60 रुपये देतो रिक्षावाल्याला त्याच्याकडे दोन रूपये सुटे नसतात मग काहीजण त्या दोन रूपयासाठी हूज्जत घालतात तोंडावरचा ताबा सूटतो मग रिक्षावालाही शिव्या द्यायला लागतो त्याचे पर्यावसान मोठ्या भांडणात होते मग मित्रांना बोलवून रिक्षावाल्याला मारहाण करतात त्यात त्याचा जीव जातो आणि मग याला मित्रांना तूरूंगवास भोगावा लागतो त्या दोन रूपयांमुळे कितीतरी कुटूंब अस्ताव्यस्त होतात .बात एकदम छोटीशी पण किती अक्राळविक्राळ तिने रूप घेतले .अशावेळी मनाचा मोठेपणा ठेवून आपले तत्व बाजूला ठेऊन सारासार निर्णय घ्यावा तसेच ट्रेनमध्ये बसमध्ये धक्काबुक्की होते तेव्हाही काही भांडणे अक्राळविक्राळ रूप धारण करतात अशावेळी तू मोठ्या बापाचा असे म्हणून ignore करावे व शांत मन ठेवावे .घरातही पती पत्नीमध्ये भांडणाचा विषय साधा असतो पण शब्दाला शब्द वाढून मागचे पुढचे सर्व विषय काढून मोठ्या भांडणात रूपांतर होते मग काय हाणामारी होते मुले गंमत बघतात त्यात मुलांचा किंवा दोघांचा जीव जातो व कुटूंब उध्वस्त होते अशावेळी माघार घेऊन विषय वाढवण्यापेक्षा त्याची तिव्रता कशी कमी होईल असे बघावे.काहीवेळा गावात गुरे एकमेकांच्या शेतात जातात किंवा बांध फोडण्यावरून किंवा जमिनीच्या घराच्या वाटणीवरून भांडणे होतात व काहीवेळा खून मारामार्या होतात .शेत किंवा घर आहे तेथेच राहते पण एक स्वर्गात तर दूसरा जेलमध्ये .अशावेळी तडजोड करून दोघांनी मध्यम मार्ग काढावा जास्त ताणत बसू नये. गाडी चालवतांना एकदम जोशात वैगाने गाडी चालवतो आजूबाजूला पायी लोक चालता आहेत याचेही भान नसते मग गाडीवरचा ताबा सूटतो व जे व्हायला नको ते होऊन बसते म्हणून गोष्ट छोटी असली तरी त्याच्याकडे डोळेझाक करता कामा नये व शांततेत जीवन जगावे व दूसर्याला जगू द्यावे.बघा जमतं का
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment