No gift
लग्नात बरेच लोक लिहितात की आपली उपस्थिती ही आमच्यासाठी फार मौल्यवान आहे तसैच कोणतेही भेटवस्तू स्विकारली जाणार नाही अशावेळी लोकांना लग्नात जाण्यासाठी कोणतेच प्रश्न पडत नाही खुल्या मनाने ते जातात मजा करतात व खरा आनंद मिळवतात पण जेव्हा भेटवस्तू आणू नये असे लिहिलेले नसते तेव्हा प्रश्न पडतो की काय द्यावि भेटवस्तू द्यावी मग ती तशीच कुणीतरी आणलेली असते मग आपण आणलेल्या वस्तूला काही किंमत नसते .काहीवेळैला आपण दिलेल्या भेटवस्तूवरून आपली किंमत ठरवली जाते .काहीवेळा पैसे आपण पाकिटात टाकतो मग एवढेच पैसे टाकले मी तर जास्त पैसे त्याच्या लग्नात टाकले होते असे बोलणे सुरू होते व नात्यात कटूता येते .काहीवेळा आपण पैसे पाकिटात टाकतो पण रिटर्न म्हणून जे मिळते ते पाहून आपला संताप होतो मग नात्यात कडवटपणा येतो मग लग्नाला बोलवणे म्हणजे नात्याला तिलांजली देणे असे सहसा होऊन जाते व मग लोक त्या निमित्ताने आयुष्यभर बोलत नाही .लग्न हे शुभमंगल असते पण भेटवस्तूवरून कडवटपणा येतो व तेच लग्न नाते तोडण्याला कारणीभूत ठरते व हे जे सर्व होते ते फक्त देण्याघेण्यावरून होते पण जर भेटवस्तू आणू नका फक्त लग्नाला या असे जेव्हा असते तेव्हा लोक आनंदात सहभागी होतात कारण देण्याचे व घेण्याचे टेंशन नसते व लग्नाला आशिर्वादही चांगले देऊन जातात व नाते आपसातले दृढ होते म्हणून लग्नाला जर सगळ्यांनी अशी अट ठेवली तर ते लग्न खर्या अर्थाने संबंध चांगले करण्यास कारणीभूत ठरते. काहिजण उपस्थितीपेक्षा त्याने लग्नाला काय आहेर केला याकडे लक्ष देतात म्हणजे माणसापेक्षा आहेराला महत्व दिले की नाते कमजोर होते म्हणून भेटवस्तूपेक्षा माणसांच्या उपस्थितीला जास्त महत्व दिले पाहिजे कारण शेवटी माणसेच अडीअडचणीला उपयोगी पडतात पण काहींना समजावणे म्हणजे दगडापुढे डोकं आपटण्यासारखे असते जे फार गरीब लोक आहैत त्यांना लग्नात मदत केलिच पाहिजे पण ज्यांच्याकडे पैसा असूनही लोकांच्या आहेराकडे नजर ठेवतात व कटूता निर्माण करतात हे अत्यंत वाईट असते बघा पटतं का व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment