एक कोडं
मला नेहमीच एक कोडं पडलेले असते ते म्हणजे लहानपणी बर्याच जणांना गरीबीचे चटके सहन करावे लागतात परिस्थितीशी झगडावे लागते कष्टांतून शिक्षण घेतात मग बर्याच हालअपेष्टा सोसून नोकरी लागते किंवा काहीजण व्यवसायमध्ये जम बसवतात पण कठिण प्रसंगाला प्रत्येकाला तोंड द्यावेच लागते .अशा बिकट परिस्थितीतून वाट काढत असतांना शरीर मात्र मजबूत असते शरिराच्या काही तक्रारी नसतात किंवा आपण शरीराकडे बघतच नसतो व शरीरही त्रास देत नाही पण पैसा यायला लागला घरदार लग्न मुलेबाळे झाले बॅंक बॅलन्स झाला व सुखाचे घास खायला मिळायला लागले की मग अचानक आजार डोकं काढायला सुरवात करतात शरीराच्या तक्रारी चालू होतात आपले स्वप्न पूर्ण झाले हे आईबाबांना दाखवायचे असते व ते बघण्यापूर्विच देवाने त्यांना नेले असते व ती एक अपेक्षा राहून जाते .घरात सतत कुणी ना कुणी आजारी पडतात. पैसा असूनही शांती मिळत नाही काहींचे मुले अभ्यांस करत नाही म्हणून त्यांच्या चिंतेने घरात शांती राहत नाही काहींचे लग्न होत नाहीत काहीजण वजनाने त्रस्त असतात म्हणजे काहींचे वजन कमी होत नाही तर काहींचे वाढत नाही काहींचे घरात खटके उडतात भावा भावात बहिणी बहिणीत खटके उडतात एकमेकांचे काहीजण तोंड बघत नाही पैसा नव्हता तेव्हा सारेजण प्रेमाने राहायचे पण आता पटेनासे झाले मग सर्व असूनही वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते .जोपर्यंत गरीबी होती तोपर्यंत शरीराची चिंता नव्हती व पैसा आला तर शरीराच्या तक्रारींचा सामना करावा लागतो काहीजण कष्टाने शिक्षण घेऊन नोकरी मिळवतात व ऐन सुखाच्या वेळी जीवघेणा अपघात होतो नाहीतर आजार नाहीतर अजून काही व इहलोक सोडून जातात .दु:खाच्या वेळी शरीर साथ देते पण ऐन सुखाच्या वेळी काहीतरी घडते व सुखाचे रूपांतर दु:खात होते मग फक्त म्हणायचे नशिबातच असेल तर आपण काय करणार? असे का होते तर प्रत्येकजण आपले मत मांडतो पण ते फक्त त्या नियतीलाच माहीत असे का होते
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment