हसरे व्यक्तीमत्व साळवी सर
सर तुम्हांला देतो निवृतीच्या
मनापासून शुभेच्छा
पूर्ण होवो तुमच्या आशा
अशी करतो देवाकडे इच्छा
देवाने दिली तुम्हांला
अनमोल देणगी एक
शरीरयष्टी बरोबरच मिळाली
बुद्धी तुम्हांला तल्लक
विषय आहे तुमचा छान
आहे त्याचे सखोल ज्ञान
तुम्ही शोभतात त्या विषयाचे
असे वाटते तुमच्याकडे बघून
सर वाटते मला तुमचे
क्षेत्र काहीअंशी चुकले
राजकारणात जाऊन तुम्ही
छान काम असते केले
तुम्ही पोलीस अधिकारीही
दिसला असता छान
एका एका गुन्हेगारीची
पकडली असती घट्ट मान
परिक्षेचा कारभार तुमच्याशिवाय
कुणीच नाही चांगला करणार
बारीक बारीक चुका शोधून
तुम्ही करतात त्या दूर
तुमच्या डोळ्यांकडे बघून
वाटतो समोरच्याला दरारा
पण मनाने आहेत तुम्ही प्रेमळ
होतो बर्याच जणांना तुमचा आसरा
घरदार सांभाळून आज इकडे
तर उद्या असतात तिकडे
कसं जमतं सर तुम्हांला
हा प्रश्न निर्माण होतो आमच्याकडे
कामाचा एवढा पसारा राहूनही
मन तुमचे शांत वाटते
काही योगा वगैरे करत असणार
असे मला तुमच्याकडे बघून दिसते
प्रत्येक काम करत असतांना
असतो तुमच्यात उत्साह फार
कुठून येतो हा उत्साह
त्याचे गुपित कधी सांगणार
हसून काम करणे ही आहे
तुमच्याकडे जादूची कांडी
ते सगळ्यांनाच जमतं नाही
त्यासाठी समजावी लागते लोकांची नाडी
तुमच्याकडे बघून वाटतो
तुमच्या मित्रांना कामाचा हुरूप
तुम्ही फक्त राहा त्यांच्या बरोबर
हवी पाठीवर त्यांना तुमची थाप
तुमच्या मदतीने अनेकांच्या
चेहर्यावर पसरतो आनंद
हसत काम करणे
आहे तुमचे जीवनाचे ब्रीद
सर द्या घरच्यांना आता भरपूर वेळ
थोडं काम कमी करून
थकून जातात त्यांचे डोळे
रोज तुमची वाट बघून
अन्यायाबद्दल आहे तुम्हांला
प्रचंड चिड
वेळप्रसंगी विरोध पत्करून
समोरच्याला बोलतात फाडफाड
लाथ मारीन तेथे पाणी काढीन
असा आहे तुमचा बाणा
तुमच्यावर ठेवतात लोक विश्वास
हे बघून खुश होत असेल विश्वाचा राणा
तुमच्या प्रेमळ स्वभावाने
जमवले तुम्ही मित्र
त्यांच्या आनंदासाठी झटतात
तुम्ही दिवस रात्र
सर तुम्ही दिसतात
आजही तरूण
तुमच्यात प्रचंड उत्साह
आहे भरभरून
सर अधून मधून रूपारेलमध्ये
येत राहा
लोकांची मरगळ तुम्ही
झटकून जात जा
तुमच्या निवृतीने होईल
काॅलेजला मोठी पोकळी
ती भरून निघणे अशक्य
असे वाटते मला वेळोवैळी
निरोगी आयुष्य भरपूर मिळो
अशी करतो प्रार्थना
ती पूर्ण होईलच अशी
आहे माझी मनोकामना
जे मला दिसले ते मी
केला प्रयत्न लिहायचा
चुकल माकलं असेल
माफीनामा घ्या आमचा
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment