स्वत:चा शोध व खेळणी
माणूस जन्माला आल्याबरोबर त्याच्यावर खेळणींचा खूप प्रभाव पडतो व या खेळणींमुळेच स्वत:चे खरे अस्तित्व माणूस विसरून जातो .लहानपणी त्याला आई जवळ हवी असते कायम पण कामं असल्यामुळे ते शक्य नसते तेव्हा त्याच्यापुढे खेळणी टाकली जातात व ती खेळणी बघून असा रमतो की आई जवळ हवी हे थोड्या वेळेसाठी विसरून जातो मग माणूस जस जसा मोठा होत जातो तस तसे खेळणींचे स्वरूप बदलते म्हणजेच त्पाला प्रलोभन दिले जाते ज्यामुळे काय खरं आपल्याला हवं हे मात्र माणूस विसरून जातो .मित्र तयार होतात व् त्यामुळे वेगळेच भावविश्व तयार होते मग नोकरी लग्न मुले यामध्ये असा गुरफटतो माणूस की आपण कोणं व कशाला जन्माला आलो हे पूर्णपणे विसरून जातो कधी सुखात न्हाऊन निघतो तर कधी दु:खात गटांगळ्या खातो व त्या नादात स्वत:चे अस्तित्व विसरायला होते .राजकारणाची एकदा चटक लागली की मग सुटता सुटत नाही .ती सरकारी लाल दिव्याची गाडी तो मान लोकांची गर्दी लोकांनी केलेला जयजयकार नोकर चाकर सत्ता मी जे म्हणेल तसे होणे मोठे पद यामध्ये अशी धुंदी येते की ती उतरायला तयार होत नाही व त्या नादात आपण कोण व काय करायला पाहिजे हे मात्र माणूस विसरून जातो .हे सारे जीवन जगण्याचे मार्ग आहेत ते अंतिम साध्य नव्हे आणि कायमचे टिकाऊही नाहीत हे नेहमी लक्षात असायला पाहिजेम्हणजे आपल्या हातून समाजसेवाच होणार .हे जे काही मिळाले ते आपल्याकडून लोकांची सेवा व्हावी म्हणून असा दृष्टीकोन मिळाला की माणूस आपल्याला काय करायला हवंयाचा विसर पडत नाही .घार आकाशात उंच घिरट्या घालते पण तिचे लक्ष पिलांपाशी असते तसेच माणूस जीवनात काहीही होऊ दे पण आपण कोणं व आपल्याला काय करायचे आहे हे कळले की मग तो रस्ता चुकत नाही.अहंभाव निर्माण होत नाही .दुसर्याला कसपटासमान समजत नाही .सर्व एकाच मार्गाने आलेत व एकाच मार्गाने जाणार व हे जे अंतर असते मार्गामधील त्याला जीवन म्हणतात व ते कसे जगायचे हे राहूनच गेले असे वाटता कामा नये
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment