वास्तव व कल्पना
वास्तव व कल्पना यांची तुलना केली की असे वाटते वास्तव सत्य व कल्पना असत्य असते .वास्तव दु:ख देते तर कल्पना सुंदर असते पण काहीवेळा वास्तव सुंदर असते पण कल्पना भयंकर असते व जी कल्पना केली ती जर वास्तवात उतरली तर काहीवेळा उग्र रूप धारण करते . ती कल्पना आहे तो पर्यंत ठीक असते पण त्या कल्पनेचे रुपांतर वास्तवात झाले की मग एकदर छान रूप धारण करते नाहीतर बेचिराख करून टाकते .आज एकजण आनंदात असतो कारण दोन दिवसांनी त्याचे लग्न होणार असते व तो कल्पनेत रंगतो .काहीवेळा त्याच्या मनात कल्पना येते की लग्नाआधी मला काही झाले तर पण ती फक्त कल्पना असते व त्या कल्पनेचा त्रास काही क्षणापुरता त्याला होतो पण खरंच तसे होते व लग्नाअधीच त्याचा अपघात होतो व जातो व ती कल्पना सत्यात उतरते तेव्हा सगळ्यांना दु:खात बुडवते काहीवेळा माणूस कल्पना करतो की मी अभ्यांस करतो आहे पण उद्या खरंच कलेक्टर झालो तर पण त्या कल्पनेने त्याला बरे वाटते पण मन मानायला तयार नसते की असे होऊ शकते व एक दिवस खरंच तो परिक्षेत प्रथम येतो व कलेक्टर म्हणून त्याची नियूक्ती होते .कल्पना अशी खरंच वास्तवात येईल याचा त्याने कधी विचारही केलेला नसतो. माणूस जीवंत आहे आज तो उद्या राहीलच याची शाश्वती नाही म्हणून त्याचे आजचे जीवंत राहणे एक दिवस कल्पनेत नक्कीच रूपांतर होणार ते वास्तव वास्तव म्हणून कधीच राहणार नाही . काहीवेळा वास्तव असते पण त्याला आपण कल्पना म्हणतो .पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो असेच काही वर्षापूर्वी बोलत होते व ते वास्तव आहे असेच समजत होते व कल्पना करत होते की पृथ्वी फिरते व सूर्य स्थिर आहे पण आज तीच कल्पना वास्तव ठरली व वास्तव कल्पना ठरली आज माणूस धडधाकट आहे व हेच वास्तव कल्पनेत बदलू शकते की तो उद्या नाही आहे म्हणून कधी कल्पना वास्तव बनते तर कधी वास्तव कल्पना बनते कधी कल्पना वास्तव बनून सुंदर बनते तर कधी क्रूर बनते तसेच वास्तवही कधी कल्पना बनते सुंदर रूपात तर कधी क्रुर रुपात कधी वास्तव हे वास्तवत राहते व कल्पना ही कल्पनाच राहते.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment