Skip to main content

गोष्टी हाताबाहेरच्या

हाताबाहेर जातात गोष्टी
बर्‍याच वेळा आपण कोणतीही गोष्ट सिरियस घेत नाही कारण काय होणार आपण नाही केले तर? व काहीच होणार नाही असा गैरसमज आपल्यात दडून बसलेला असतो व त्यामुळेच आपण चालढकल करत असतो तेव्हा बर्‍याच गोष्टी हाताबाहेर जातात म्हणजेच आता आपल्या हातात काहीच नसते  वेळ निघून गेलेली असते उदा. सकाळी लवकर उठून चालावे प्राणायाम योगा करावा असे आपण फक्त ऐकत असतो पण सुरू करायला आपल्याला मुहूर्तच सापडत नसतो कारण आळसामुळे आपल्याला बेडमध्येच पडून राहावसं वाटतं व आज करू उद्या करू असे करता करता बरेच वर्ष निघून जातात मग काहीचे वजन प्रचंड वाढलेले असते काहींना blood pressure निर्माण झालेला असतो काहींना हार्टअॅटेक येऊन गेलेला असतो काही वाचतात पण काही जातात काहींना पक्षाघात झालेला असतो तसेच अजून बरेच शारिरीक व मानसिक व्याधी जडतात मग जे केले नाही म्हणून हे सर्व घडते तेव्हा माणसाचे डोळे खाडकन उघडतात पण उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते तसेच ते करण्यासाठी आपले शरीरच साथ देत नाही या सार्‍या गोष्टी हाताबाहेर जातात व पश्चाताप शिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही म्हणून वेळिच सावध होण्याची गरज आहे व आळस झटकण्याची गरज आहे शेवटी आपले आरोग्य याला पहिले स्थान द्यायला हवे आपले आरोग्य चांगले राहिले तर नोकरीत रस वाटेल संसारात मग्न व्हाल बायकांपोरांकडे लक्ष देता येईल .भटकता येईल व सर्व  गोष्टी करायला उत्साह वाटेल नाहीतर घरचे दारचे म्हणतील काय माणूस आहे रोगांचे भांडार .एवढे रोग आहेत कधी जाईल याची वाट बघणार सगळ्यांचे प्रेम आटून जाईल व हाताबाहेर जायला आपण व आपला आळस हेच कारणीभूत असतात व प्रत्येक गोष्ट गांभिर्याने आपण घेत नाही निदान आरोग्याच्या बाबतीत  तरी.तसेच काही व्यक्तींना आपण गृहित धरतो वत्यांच्याकडे बिलकूल लक्ष देत नाही पण ज्यावेळी ती खूप दूर निघून गेलेली असते तेव्हा समेट घडवणे आपल्या हाताबाहेर असते तेव्हा वेळिच त्या व्यक्तींचे आपल्या जीवनात असलेले महत्व लक्षात घेऊन ताठर भूमिका सोडून लवचिकता ठेवावी व हाताबाहेर जाऊ देऊ नये तसेच काही जणांच्या गरजा अमर्याद असतात व त्या गरजेपोटी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतात व आपल्या गरजा पूर्ण करतात तेव्हा कर्जाचा डोंगर एवढा वाढतो की ते फेडणे आवाक्याच्या बाहेर असते व मग हाताबाहेर गोष्टी जातात त्यात काही स्वत:ला संपवतात तर काही स्वत:सकट कुटूंबालाही संपवतात  काही पळ काढतात म्हणून कोणतीही गोष्ट हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी .बघा जमतं का
प्रा दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...