Skip to main content

राजा राहून भिकारी

राजा राहून भिकारी
एक असतो राजा त्याच्याजवळ भरपूर संपती नोकर चाकर सर्व सुखं पायाशी लोळण घेत असतात मग एक दिवशी त्याला स्वप्न पडते की आपण भिकारी आहोत खायला अन्न नाही राहायला घर नाही अंगभर कपडा नाही दारोदारी भटकतो आहोत  सर्वजण आपला तिरस्कार करतात .संपूर्ण रात्र त्या भिकारी झाल्याच्या स्वप्नात घालवली मग त्याला जाग आली व बघतो तर आजूबाजूला सर्व सुखं हजर असतात मोठा महाल सैन्य खायची रेलचल .त्याचप्रमाणे प्रत्येकाजवळ असे काही आत आहे की  ते असूनही दिसत नाही. जो जगाचा चालनकर्ता आहे तोच आपल्यात बसला आहे त्याच्या शक्तिनेच आपण चालतो बोलतो म्हणजेच जीवंत आहोत जसे एखाद्या बीजांत मोठे झाडं लपलेले असते व योग्य वातावरण लाभले की मग तो मोठा वृक्ष होतो  तसेच ते महान तत्व आपल्यात आहे हे आपण विसरतो व हा असे बोलला तो तसा बोलला त्याला धडा शिकविन त्याला बघून घेईन अशा गोष्टीमध्ये सारे आयूष्य वाया घालवतो व त्या सुखापासून आपण वंचित होतो संत म्हणतात खरे सुख बाहेर कोणत्याही गोष्टीने मिळणार नाही .आहे ते आतच पण आपण त्याचा कधीच शोध घेत नाही त्या आत्मतत्वाला ओळखू शकत नाही व मी अमूक आहे मी तमूक आहे हे सांगण्यातच आपले आयूष्य खर्चि घालतो वास्तविक आपल्याला नविन कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण त्या तत्वाशिवाय सारे सर्व व्यर्थ आहे म्हणून तो आपल्यात आहे पण आपले कधिच लक्ष जात नाही म्हणतात ना काखेत कळसा व गावाला वळसा किंवा कस्तूरिचा सुगंध त्या मृगाजवळच असतो पण त्याला त्याची जाणीव नसते व तो शोधण्यासाठी पळत सुटतो पण त्याला तो कधीच बाहेर मिळत नाही कारण त्याच्याजवळच आहे हे त्याला त्याची कधीच जाणीव झालेली नसते. त्याचप्रमाणे आपल्यात तो परमात्मा आहे व त्याच्या शक्तीनेच आपण सर्व व्यवहार करतो याची आपल्याला जाणीव नसते उलटं तो दिसू नये म्हणून आपण अनेक उपाययोजना करतो उदाहरण म्हणजे नितळ पाण्यात एक नाणे पडले आहे पण ते दिसू नये म्हणून जर कुणी पाण्यावर घाण टाकत राहीन तर ते कसे दिसणार त्याचप्रमाणे तो आत दिसू नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो नको ते खातो नको ते पितो जो करू नये विचार तो करतो असे कर्म करतो की कायम आत अशांती वाटते भिती वाटते मन कायम चलबिचल असते कुणाच्या एका शब्दाने रागाचा असा पारा चढतो की आत शांती कमवलेली असते ती बेचिराख होऊन जाते जस काय संपती वर्षभर कमवावी व एक दिवस तिला आग लावावी त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारे शांत राहण्यासाठी उपाय करतो पण कुणीतरी सोम्या गोम्या येतो व त्याच्या शब्दाने आपण असे भडकतो की सारी शांतीला पळवून लावतो व आपण मग भिकारी बनतो शांतीच्या बाबतीत आपले आनंदी राहणे शांत राहणे दुखी राहणे याच्या चाव्या आपण दुसर्‍यांच्या हातात देत असतो मग जेव्हा तो चावी देईल तसे आपण वागतो त्याने प्रशंसा केली की आपण सुखावून जातो त्याने वाकडं तिकडं बोलले की आपण दुखावून जातो व त्याचा राग एवढा मनात भरतो की चांगल्या गोष्टी बाहैर जातात व त्याची जागा राग घेतो  आपण आयुष्यभर एखाद्याच्या वाईट वागणूकीबद्दल चिंतन मनन करत असतो अशा पध्दतीने आपल्या आतील तत्वाकडे आपण बारकाईने कधी बघत नाही म्हणून आपण राजा राहूनही भिकारीसारखे जगतो कारण भिकार्‍याच्या स्वप्नातून आपण बाहैरच कधी येत नाही त्या शक्तीला आपण नाकारतो ती शक्ती वगैरे काही नाही असे म्हणतो देव खोटा असे म्हणतो म्हणजेच स्वत:लाच नाकारतो  .बघू या प्रयत्न करून स्वप्नातून  बाहेर  पडण्याचा व विचार करून शिताफीने त्यातून सुटका करू
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...