शिक्षण व माणूस
समोरचा माणूस शिकलेला आहे हे लगेच समजून येते त्याच्या बोलण्यावरुन चालण्यावरून व वागण्यावरुन व ते असतेच अपेक्षित ज्या शिक्षणाने माणसाच्या विचारात सकारात्मक बदल होतो ते खरे शिक्षण .शिक्षणाने आपल्या भावनांवर ताबा मिळवता आला पाहिजे आपल्या रागावर आपल्या आनंदावर दु:खावर नियंत्रण मिळवता आले पाहिजेज्या शिक्षणाने माणसातील माणूसकी जिवंत झाली ते खरे शिक्षण .शिक्षणाने पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्याच्या भाषेत जशी वेळ असेल तसे कठोर किंवा मृदू शब्द यायला हवेत शिक्षणाने कुणाचे नुकसान होता कामा नये पणसध्या शिक्षित माणसालाच घाणेरड्या शिव्या येतात समाजाचे नुकसान कसे होईल व आपला फायदा कसा होउल अशी स्वार्थी भावना शिक्षणाचा दुरूपयोग केल्याने होतो खून दरोडे बलात्कार बाॅम्बस्कोट यासारखे कृत्य उच्चशिक्षित लोकांकडूनच केले जाते .एक डाॅक्टर इंजिनिअर शिक्षक उद्योगपती यासारखे लोक संकट आल्यावर किंवा राग अनावर झाल्यावरआत्महत्या करतात किंवा दुसर्याचा घात करतात मग असे होत असेल तर त्या शिक्षणाचा काय फायदा असले लोक फक्त डिग्री घेतात पैसे कमवतात पण स्वत:च्या विचारात आचारात कवडीचाही बदल करत नाही.त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ कळलेला नसतो.शिक्षणामध्ये एवढे वर्ष व्यतित केल्यामुळे त्याचा खरा अर्थ कळलेला असावा .काही वेळा अशिक्षित लोक हे शिक्षित लोकांपेक्षा कैकपटीने चांगले असतात.खरे शिक्षित होण्यासाठी शाळेतच जावे असे काहीही नसते .बर्याच वेळेला शिक्षित लोक हे अशिक्षित असतात तर अशिक्षित लोक बर्याच वेळेला सुशिक्षित असतात.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment