एक सत्य
आज मी ठाण्याला तलावपाळीवरुन जात होतो तेव्हा काही दृश्य बघून विचारात पडलो काही जण उघड्यांवर झोपले होते काहीजण शिळे अन्न खात होते काहींचे कपडे मळलेले फाटके .लहान मुले नागडे रांगत होते काही खेळत होते काहींनी किती दिवसापासून आंघोळ केलेली नसेल काही कामधंदा नसल्याने माणसे आळसात बसले होते म्हणजे अन्न वस्र निवारा या मुलभूत गरजा मिळण्यासाठी हतबल झालेले माणसे पाहिली व पूर्ण आयुष्य निघून जाते पण या गरजा त्यांना कधीच मिळत नाही मग अशावेळी वाटते की आपल्याला नोकरी मिळेपूर्वी किती हतबल असतो व नोकरी ठिकाणी जे कामं सांगितले ते करण्यासाठी आपण तयार असतो पण जसजसे वर्ष जातात तसतसे काहीजण कामचुकार बनतात वेळेवर कामावर येत नाहीत उशिरा येणे असा नियमच बनून जातो तसेच दोनचार पेपर जादा तपासायला लागले तर लगेच हमरीतुमरीवर यायला तयार असतात एक दोन जास्त तासिका मिळाली की लगेच रागाचा पारा चढतो काही जास्त काम पडले की लगेच तक्रारी सुरू होतात मलाच का ?असे प्रश्न तयार होतात प्रत्येक कामाठिकाणी गट तयार होतात एकमेकांचे यश हे डोळ्यात खुपायला लागते .तसेच वेळेवर पेपर न देणे उशिरा येणे नम्रपणा सोडणे पैशांचा गर्व येणे दुसर्याला कमी लेखणे अशा अनेक गोष्टी चालू होतात पण ज्या कामामुळे आपल्याला पैसे मिळतात ते आपण किती प्रामाणिकपणे करतो याचा विसर पडायला लागतो व नोकरीच्या आधीच्या दिवसांचे विस्मरण होते व मी कोणितरी वेगळा आहे असा गैरसमज तयार होतो ज्या लोकांना कामधंदा नाही ते कामाची वाट बघतात पण काम मिळत नाही व ज्यांना काम मिळाले ते खरंच मनापासून करतात का? हे प्रत्येक क्षेत्रांतल्या माणसांनी विचार करायची गरज आहे.आपल्याला काही तरी काम आहे हिच गोष्ट फार मोठी आहे आपल्यासाठी व त्या कामाचा योग्य मोबदला मिळतो ही त्याहून मोठी गोष्ट आहे .बघा विचार करा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment