कुंडली
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे कुंडली जुळवण्याचे काम जोरात चालू आहे .दोघांना एकमेकांची पसंती झाली तरी कुंडलीवरून लग्न जुळत नाही .तेथील गुण जुळत नाही त्यामुळै कुंडली जे बनवतात त्यांचा बाजार जोरात चालू आहे बरं कुंडलीवरून लग्न जमले तर ते टिकतेच असे नाही .कुंडलीमध्ये सांगितलेले असते की सुखाचा संसार होईल पण तसे घडतांना काहींच्या जीवनात दिसत नाही .कुंडलीला अनावश्यक महत्व दिले जाते जे बघायला पाहिजे ते बघितले जात नाही मुलाचा स्वभाव किंवा मुलीचा स्वभाव त्यांची घरची परिस्थिती घरातले संस्कार त्याचे किंवा तिचे शिक्षण एकमेकांच्या जीवनातल्या अपेक्षा त्यांचे राहणीमान तसेच मुलाला कोणते व्यसन आहे का ?त्याचा रक्तगट तसेच त्याची रक्तांची चाचणी त्यानुसार मुलाला किंवा मुलीला कोणता आजार तर नाही ना याची डाॅक्टरांकडून तपासणी अशा गोष्टी करायला पाहिजे पण हे सर्व बाजूला राहते व नको त्या गोष्टीला महत्व दिले जाते मग लग्नानंतर त्याच्यात किंवा तिच्यात काही आजार तसेच व्यसन दिसून आले तर पश्चातापाची वेळ येते मग एकतर लग्न मोडतं किंवा आहै त्या परिस्थितीत दिवस ढकलायचे असतात .बर्याच वेळेला मुलगा किंवा मुलगी शिक्षणाच्या बाबतीत तसे नोकरीच्या बाबतीत खोटं बोलतात व आपण विश्वास ठेवून मोकळे होतो मग लग्नानंतर खरं रूप बाहेर पडते मग आपली फसगत झाली असे बोंबलत सुटतो आणि मुलगा जेवढ्या मोठ्या नोकरीला तेवढा पैसा जास्त खर्च करायला सांगतो मुलीच्या बापाला .लग्नात दिलेला शब्द पाळला नाही म्हणून अनेक मुलींना माहेर परकं होतं .पैसा हा चांगला जसा आहे तसा वाईटही तेवढाचं .त्यामुळे लग्न जुळवतांना कोणत्या गोष्टींला महत्व द्यावे हे ज्याने त्याने ठरवावे जेणेकरून लग्न झाल्यावर आपल्याला माहीत नसलेले प्रश्न समोर येवू नयेत व दोघांचा संसार सुखाचा चालू राहावा .बाकी कुंडली वगैरे हे गौण ठरतं .ज्यांना विश्वास ठेवावा त्यांनी जरूर ठेवावा पण बाकी गोष्टींना पण त्यापेक्षा अधिक महत्व द्यायला हवं .बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे
7738601925
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment