मी बघतो ना पण
बर्याच वेळा ट्रेनने काहीजण विनातिकिट प्रवास करतात कारण समजतात की टीसी कुठे बघणार आहे .कुणाचा वचक नसेल तर गैरमार्ग करायला काय हरकत आहे असे बर्याच जणांना वाटते .त्यात चोरी आली खोटे बोलणे आहे कारण त्यांना असे वाटते कोण बघतो आपल्याला हे करतांना पण एक जण हे सर्व बघत असतो तो म्हणजे आपण स्वत: ट्रेनमध्ये तिकिट न काढता प्रवास करणे व तिकिट काढून प्रवास करणे यात जमीन आसमानचा फरक असतो कारण तिकिट न काढता प्रवास करतो तेव्हा टीसी जरी नाही आला तरी केव्हाही येऊ शकतो या भीतीने मनशांत नसते पण तिकिट काढून प्रवास केला तर मन शांत असते व शांत मनाने प्रवास करता येतो कारण आपण गैर करतो हे मनाला माहीत असते त्यामुळे तशी स्थिती मनाची तयार होते तसेच कोणतीही चुकीची गोष्ट केली तर कुणाला जरी नाही कळली तरी स्वत:ला माहीत असते त्यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते व आपलेच मन अशांत होते त्यामुळे इतरांचा विचार न करता स्वत:ला शांत ठेवायचे असेल तर चुकीच्या गोष्टी होणार नाहीतअशी काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे मन अशांत होणार अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत काही वेळा अन्याय सहन केला तरी मन अशांत होते तेव्हा तो सहन न करता त्याला विरोध केला पाहिजे जेणेकरून ते करूनआपण शांत झालो पाहिजे म्हणून कोणतीही गुपित गोष्ट करतांना जरी कुणी नाही बघितली तरी ती आपण बघत असतो याची जाणीव झाली की मग सहसा चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत. बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment