खतरनाक अतिरेकी
अतिरेकी म्हटले की आपल्या मनात भीती निर्माण होते .हे अतिरेकी लपून हल्ला करतात तरीपण त्यांच्यावर प्रतिहल्ला करून त्यांना मिटवता येते पण आपल्या शरीरात अतिरेकी कधी घुसतात याचा आपल्याला थांगपत्ता नसतो व आतून ते आपल्या अवयवांवर हल्ला करत असतात याची थोडीशीही चाहूल आपल्याला लागत नाही कधी घुसले कसे घुसले हे आपल्याला कळत नाही मग जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते व त्यांनी शरीराचा बराच भाग हा गिळून घेतलेला असतो त्याच्यावर आपला कब्जा केलेला असतो मग परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते .मग तुम्ही परदेशात जरी उपचार घेतले तरी या अतिरेक्यांना कुणीच नष्ट करू शकत नाही .शरीर नष्ट केल्याशिवाय हे अतिरेकी शांत बसत नाही बर्याच वेळा अशा अतिरेक्यांना आपणच आमंत्रित करत असतो कारण हे अतिरेकी तंबाखू बिडी सिगारेट अफू दारू गुटखा प्रदुषित पाणी घरातील घाण यात लपलेले असतात व याची आपल्याला पुसटशी कल्पना नसते किंवा माहीत असूनही आपण काय होते असे बोलून कानाडोळा करतो किंवा अमूक किती वर्षानी दारू पितो बिडी पितो सिगारेट पितो त्याला काहीच झाले नाही मग मला कशाला होईल अशी स्वत:ची समजूत काढून त्या व्यसनापासून दुर जात नाही अरे प्रत्येकाची प्रतिकार शक्ती सारखी नसते त्याच्या शरीरात त्या अतिरेक्यांशी मुकाबला करण्याची प्रतिकार शक्ती असेल पण तुझ्यात असेलच असे नाही म्हणून कशाला आमंत्रण द्यायचे .बरं काही वेळा हे अतिरेकी वरील गोष्टींमधून न जाता विचारांमधून जातात .सतत नकारात्मक विचार तसेच दुसर्याबद्दल सतत द्वेष मत्सर राग करत राहणे .अतिलोभ करणे .स्वार्थीपणामुळे कोणत्याही थराला जाण्याचा विचार .अशा विचारांतून हे अतिरेकी शरीरात घुसतात व मग ब्लड प्रेशर मधुमेह कॅन्सर हार्टअॅटेक अशासारखे रोग घेऊन येतात .म्हणून अतिरेकी घुसण्याचे दोनच मार्ग आहेत एकतर खाण्यातून आणि विचारातून ते आपल्या आत घुसतात व आपल्या शरीरावर ताबा मिळवतात म्हणून सोपा उपाय म्हणजे त्यांना घुसू न देणे .हे पाहिजे तसे सोपे नाही पण अशक्यही नाही .ज्यांना शक्य झाले त्यांचे जीवन निरोगी आनंदी उत्साही नक्कीच होईल . म्हणून आपणच आपला शत्रू असतो व मित्रही असतो .आपण आपलाच मित्र बनूया .बघूया प्रयत्न करून अतिरेक्यांना थोपवण्याचे .जमेल ना ?
प्रा दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment