सबसे बडा रोग ।क्या कहेंगे लोग
माणसाचे सारे आयुष्य लोक काय म्हणतील या विचाराने संपून जाते व मनासारखे जगायचे राहूनच जाते.लोकांचा जरूर विचार करावा त्यामुळे वाईट गोष्टी आपल्या हातून होत नाही पण छोट्याछोट्या गोष्टी चांगल्या असुनही लोक काय म्हणतील या भीतीने आपण चालढकल करतो आपल्याला नाचायची हौस असते नातेवाईकांच्या लग्नात पाय थिरकायला लागतात मग लोक काय म्हणतील या भीतीने आपण ती इच्छा मारून टाकतो मोठ्या हाॅटेलमध्ये चमच्याने खातांना आपल्याला त्रास होतो कारण हाताने खातांना जास्त आनंद वाटतो पण लोक काय म्हणतील या भीतीने आपण हाताने खाण्याचा आनंद घेऊ शकत नाही कपडे आपल्याला वेगळे प्रकारचे काहीवेळा घालायचे असतात काही कार्यक्रमाच्या निमित्ताने पण लोक काय म्हणतील असे वाटून तेथेही इच्छा आपण मारून टाकतो .काहीवेळा आपल्याला आपले मत वरिष्ठापुढे मांडायचे असते पण लोक काय म्हणतील म्हणून आपण ते मत उघड करत नाही .कुठे जेवायला गेलो पार्टीत तर काही पदार्थ आपल्याला खूप आवडलेले असतात पण लोकांच्या बोलण्याच्या भीतीने आपण तो पदार्थ पुन्हा घेण्याचे टाळतो .आपल्या जोडीदाराबरोबर फिरायला जेव्हा जातो तेव्हा लोकांच्या भीतीने शक्य तेवढे प्रेमाने जवळ येत नाही म्हणून लोक काय म्हणतील ही भीती सोडून दिली तर छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद मिळवता येईल व मनसोक्त जगता येईल .आपल्या वागण्याने लोकांना त्रास होईल या भीतीने शक्य त्या गोष्टी टाळण्यावर भर असावा .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment