अन्नाचा अपमान
ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र धावतो त्याचाच आपण पदोपदी अपमान करतो जरा इकडे तिकडे बघा लोकं लग्नाच्या पार्टीत हाॅटेलमध्ये ताटात भरभरून वाढून घेतात त्यात थोडे खातात व बाकीचे अन्न टाकून देतात व टाकतांना कोणतीही खंत नसते अन्न टाकतांना सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच .एकीकडे लोकांना खायला मिळत नाही व दुसरीकडे अन्न कचर्यात फेकून देतात तसेच घरात बर्याच लोकांना सवय असते ताटात वाढून घ्यायचे व जेवढे खायचे तेवढे खायचे व बाकीचे टाकून द्यायचे पण जर थोडे थोडे घेतले वआवडले तर ठिक व नाही आवडले तर जे घेतले ते संपवा व नंतर घेऊ नका आवडले असेल तर अजून घ्या पण तसे न करता एकदम सर्व पदार्थ घ्यायचे जे आवडले ते खायचे व जे नाही आवडले ते टाकून द्यायचे हेअन्न जे टाकतात त्यांची कीव करावीशी वाटते व संतापही येतो काही बहाद्दर बाहेरचे टेंशन घरात काढतात जेवणाचे ताट समोरअसताना जर भाजी नाही आवडली किंवा समोरची व्यक्ती जेवतांना उलटसुलट बोलली तर मग सरळ जेवणाचे ताट फेकून देतात व मी कसं केले याची चवदारपणे चर्चा करतात ज्या अन्नावर आपण जगतो त्याचाच अपमान करतो.एकदा माझा विद्यार्थी मला भेटायला आला व त्याला भूकही लागलेली होती मी त्याला जवळच्याच हाॅटेलमध्ये नेले व आम्ही इडली मागवली त्याबरोबर चटणी पण होती त्याने इडली थोडी चटणी लावून खाल्ली व बाकी राहिलेली चटणी तशीच पडू दिली शेवटी वेटरने टाकून दिली मी मात्र चटणी पूर्ण संपवली मला टाकायला नाही आवडतं ज्याच्यासाठी दाहीदिशा फिरतो त्याचाच असा अपमान करू नये अन्नाचा अपमान म्हणजे ज्याने निर्माण केले त्याचाच अपमान ते अन्न शेतकर्यापासून तर आपल्या ताटापर्यंत कसा प्रवास करून आले व आपण सरळ टाकून देतो.विचार करा आपल्या अवतीभवती टाकतानाचे चित्र दिसले असेल किंवा आपल्यापैकीच बरेच जण ताटात अन्न टाकून देत असतील असे टाकल्याने ते अन्न चांगला आशिर्वाद नाही देणार अन्न हे पुर्णब्रम्हा त्या ब्रम्हाचाच आपण अपमान करतो .विचार करा व अन्नाचा सन्मान करा जेवणाआधीही नमस्कार करा व जेवण झाल्यावरही नमस्कार करा अन्नाला. तेव्हा ते अन्न आनंदी होईल व भरभरून आशिर्वाद देईल व जीवनात कधीच अन्न कमी पडणार नाही
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment