प्राण्यांकडून माणसाने शिकावे
माणूस स्वत:ला बुध्दिमान समजतो पण काही गोष्टी प्राण्यांकडून शिकल्या तर धन्य होईल माणसाचे जीवन .कुत्रा हा प्राणी किती प्रामाणिक असतो तेव्हा हा गुण त्याच्याकडून घ्यावा . तसेच जीभ बाहेर काढून प्राणायाम सतत त्याचा चालू असतो त्यामुळे हार्टअॅटेक कधी त्याला येत नाही तसेच घोडा कितीही पळाला तरी त्याला दम लागत नाही कारण योगामध्ये एक मुद्रा आहे तिला त्याचेच नाव दिले आहे अश्वमुद्रा .ही मुद्रा तो सतत करत असल्याने त्याच्यात उर्जा कायम राहते.बकरी ही एकच वनस्पती खात नाही अनेक प्रकारच्या वनस्पती खाते त्यामुळे ती काटक असते .मांजर ही जेव्हा घरी पाळली जाते तेव्हा घरातील माणूस कधी बाहेर गेला व कामं करून जेव्हा घरी येतो तेव्हा ती त्याच्या पायात घुटमळते व आपले प्रेम व्यक्त करते आपण घरी आल्यावर किंवा घरातील व्यक्ती कामावरून घरी आल्यावर आपण कधी प्रेम व्यक्त करतो का? नसेल तर मांजरकडून शिकावे.जे जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांसाहार करतात फक्त माणूस त्याला अपवाद आहे सुगरणी हा पक्षी कोणतेही शिक्षण न घेता किती छान प्रकारे घरटे बांधतो पण काहीजण शिकूनही काही इमारती बांधतात पण काही वर्षातच त्या कोसळतात आकाशात पक्षी एका रांगेत शिस्तबध्द पध्दतीने उडतात मुंग्या चालतांना एका रांगेत चालतात प्राणी व पक्षी आपल्या अपत्यावर जीवापाड प्रेम करतात ते ही मोठेपणी आपल्याला उपयोगी पडतील हा विचारही नसतो मधमाश्या एकत्रित कुटूंब म्हणून राहतात व आपली कामं नेमून दिल्याप्रमाणे करतात अशाप्रमाणे असे अजून अनेक प्राणी व पक्षी आहेत की त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे .बघा निरिक्षण करा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment