दिवेकर मॅडम व दिक्षित सर यातील साम्य
लोकांना वाटतं दिवेकरांचे ऐकायचे की दिक्षित सरांचे व दोन गट पडलेत पण आज मी दिवेकर मॅडमची मुलाखत ABP माझा वर ऐकली तेव्हा मला लक्षात आले की सर व मॅडम यांचे बरेचसे म्हणणे सेम आहे मॅडमचे म्हणणे असे की माणसाने पोटाचे ऐकले पाहिजे म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचे उगीचच भूक मारत बसायचे नाही तसेच योगा व रोज चालणे व्हायला पाहिजे ताक घेतले पाहिजे सिजनमध्ये येणारे फळे भाज्या खाल्या पाहिजे वरणभात व तूप खाल्ले पाहिजे व हे सर्व पोट मागेल तेव्हा द्यायचे जिभं मागेल तेव्हा द्यायचे असे त्या म्हणाल्या नाहीत .लोकांमध्ये जो गैरसमज आहे की दौन दोन तासाने खायचे असे दिवैकर मॅडम बोलतात पण असे त्या म्हणाल्याच नाहीत फक्त एवढे म्हणाल्या पोटाचे ऐकले पाहिजे म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचे मग काहींना दोन तासाने काहींना तीन तासाने काहींना एक तासाने भूक परत लागू शकते तेव्हा भूक न मारता त्यांनी खाल्ले पाहिजे असे त्यांचे मत आहे .जेव्हा त्यांना त्यांच्या खाण्याच्या रूटीनबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की सकाळी उठल्यावर त्या एक केळ खातात मग जीमला जातात .जीमवरून आल्यावर नास्ता करतात पोहे उपमा किंवा अजून काही पण रोज नास्ताला वेगवेगळे पदार्थ असतात मग त्या आॅफिसला जातात नंतर 12च्या आधी लंच करतात त्यानंतर तीन वाजता चणे शेंगदाणे खातात मग पाच सहा वाजता काहीतरी हलका आहार घेतात किंवा फळे खातात व रात्री आठ वाजता डिनर घेतात व साडे नऊ वाजता झोपतात .त्यांचे म्हणणे असे की वेळेवर जेवण केले पाहिजे वेळेवर झोपले पाहिजे तसेच ताटामध्ये अन्न घेतल्यावर खातांना टीव्ही मोबाईल किंवा वादात्मक चर्चा करू नये .खातांना फक्त त्याकडेच लक्ष असावे
मग दिक्षित सर ही तेच सांगतात की तुम्हांला भूक जेव्हा लागते ती वेळ ठरवा व त्यावेळी खा व तेही पूर्ण जेवण घ्या मग असे जेवण घेतल्यावर कशाला भूक लागणार तसेच वरणभात खाऊ नका असे सरपण म्हणत नाही सर्व खा असेच ते म्हणतात बाहेरचे खाऊ नका असे दोघांचे म्हणणे आहे रोज चाला व योगा करा असे सरही सांगतात लोकांना शिस्त यावी म्हणून किती वेळ चालायचे असे सरांनी सांगितले पण हा ही मुद्दा दोघांचा सारखाच म्हणजे चालायला पाहिजे वेळेवर खाल्ले पाहिजे वेळेवर चालणे वेळेवर झोपणे हे दोघांचे सारखेच मत आहे.दोनवेळाच खा असे सर म्हणतात व मॅडमचे म्हणणे असे की पोट जेव्हा मागेल तेव्हा द्या मग पूर्ण जेवण घेतल्यावर कशाला पोट मागणार आहे .मॅडमनी असे कुठेही म्हटले नाही की प्रत्येक दोन तासानंतर दोन दोन चपाती भाज्या खा म्हणून त्यांनी त्यांचे जे रूटीन सांगितले आहे ते बघा व त्या काय केव्हा खातात ते.म्हणून दोघांच्या मतामध्ये बरेच साम्य आहे त्यामुळे उगीचच दोन तट निर्माण न करता जे झेपेल आपल्याला व एक मध्य काढून व आपल्याला जमतं असे बघून करावे कारण दोघांचा हेतू सारखाच व म्हणणे ही बर्याच प्रमाणात सारखे आहे म्हणून वाद न घालता जे झेपते ते करावे व दोघांच्या मतांचा आदर करून चांगल्या गोष्टी घ्याव्यात व आपल्यात बदल करावा त्यामुळे नक्कीच वजन कमी होईल व तंदूरस्त वाटेल स्वत:ला बघा विचार करा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment