आयुष्य
एकदा एक उद्योगपती आपल्या कोट्यधीश कारने विमानतळाकडे जात होता बरोबर बायको मुले होती बायकोच्या अंगावर हिरे माणिक मोत्यांच्या माळा तसेच त्याच्या गळ्यात सोन्याच्या चैनं प्रत्येक बोटात अंगठ्या तसेच मुलांवरही भारी कपडे .परदेश वारीला निघालेले कुटूंब विमानतळाकडे जात होते .ड्रायव्हर त्यांना सोडायला आला होता रस्त्याने जात असताना त्यांना एक धनगर दिसला बरोबर मेंढ्या होत्या तसेच त्याने आपले सामान घोड्यावर ठेवले होते बायको होती त्यांच्यावर मळलेले कपडे साधी भाजी भाकरी खात होते मुलेही आनंदी होती पण त्यांचे राहाणे बघून उद्योगपतीला किळस वाटली व बोलला किती दरिद्री हे लोक कसे जीवन जगताहेत व माझे जीवन बघा मग पुढे गेल्यावर एक शेतकरी दिसला शेतात काम करत होता त्याच्याबरोबर बायकोही काम करत होती अंगावर फाटकं लुगडं व त्याच्या अंगावर फाटलेला शर्ट पण छान गप्पा मारत कामं करत होते त्यांच्याकडे बघून उद्योगपतीला वाटले की शिक्षण व ज्ञान नसल्याने बिचारे हलाकीचे जीवन जगताहेत व मी बघा .माझ्या ज्ञानाने माझ्याकडे अब्जावधी रूपये आहेत व गाडी व विमानाशिवाय मी कुठेच जात नाही अशाप्रमाणे गर्वाने फुगून विमानतळ गाठले व विमानात सहकुटूंब बसला विमानाने आकाशात झेप घेतली व समुद्रावरून जात असताना अचानक त्याच्यात बिघाड निर्माण झाला व डोळ्याची पापणी हलायच्या आत ते समुद्रात कोसळले व सगळ्यांचा मृत्यू झाला मग हिरे माणिक मोती अब्जावधी रूपये तसेच मिळवलेले ज्ञान रुपवान बायको हे काहीच कामाला आले नाही व अंत झाला. समुद्राच्या एवढ्या तळाशी गेले की त्यांचे शवही मासे खाऊन गेले .होत्याचे नव्हते झाले म्हणून मिळालेले ऐश्वर्य किंवा कमावलेले ऐश्वर्य यांचा गर्व न करता सगळ्यांना यथोचित मान द्यावा .जगात कुणीही श्रेष्ठ नाही की कनिष्ठ नाही .सर्वजण आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत त्यामुळे सगळ्यांना सारखाच मान द्या सगळ्यांची किंमत सारखीच उद्या कोण कुठे जाईल व कुणाचे काय होईल हे आपल्या हातात नाही पण प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आयुष्य यांचा सन्मान करायला हवा म्हणजे गर्वाची हवा मनात शिरत नाही .बघू या आपल्याला जमतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment