आभासी
सगळीकडे आभास भरला आहे व त्या आभासालाच सत्य मानून आपण चालतो आहोत उदा. सूर्य स्थिर आहे पण चालतांना दिसतो तसेच पृथ्वी फिरते आहे पण स्थिर वाटते व त्या स्थिरतेमुळे व्यवहार चालू आहेत पण तो आभास आहे खरे तर ती फिरते आहे व आपणही फिरतो आहोत तिच्या बरोबर. पण दैनंदिन जीवन जगताना असे वाटत नाही की ती फिरते आहे तसेच हवेमध्ये लाखो सूक्ष्म किटाणू आहैत पण हवा आपल्याला स्वच्छ वाटते कारण ते एवढे सूक्ष्म आहेत कीआपल्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे हवा शुध्द दिसते तो ही आभासच आहे तसेच काळ प्रचंड वेगात चालू आहे पण दिसत नाही पुढच्या 100 वर्षात आज जीवंत असलेले एकही दिसणार नाही व जे दिसतात तो ही आभासच आहे काळ पळताना दिसत नाही तो स्थिर वाटतो म्हणूनच आपण तू तू मै मै करतो .आपल्या शरीरातील खूप पेशी प्रत्येक सेकंदाला नष्ट होतातव नवीन जन्माला येतात पण याची काहीही कल्पना आपल्याला नसते जे शरीर बाहेरून दिसते तेपण आभासच आहे काही वर्षापूर्वी आपण बालक होतो व आज शरीर म्हातारपणाने जीर्ण झाले आहे व हे एवढे प्रचंड वेगात घडले की कळलेच नाही व तरूण पणा हा एक आभासच होता नातीगोती वेळ आली की आपले रंग दाखवतात व तेव्हा वाटते चांगूलपणाही एक आभासच असतो शरीरावरची चामडीच्या खाली सर्वाचे शरीर सारखेच असते मग चामडी ही एक आभासच की म्हणजेच जन्माला आलेला मरतो मग जीवंतपणाही एक आभासच आहे की म्हणजेच सारे जग आभासावर चालले आहे घरात किती सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात व एक दिवस असा येतो की घरातला सदस्य कायमचा निघून जातो देवाघरी मग तो होता आपल्या बरोबर तोही आभासच होता ना. खरं कुणालाच माहीत नाही .सर्वच आश्चर्यकारक आहे .बघा विचार करा व आभासी जीवनाचा आनंद लूटा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment