आत आणि बाहेर
माणसाच्या शरीराच्या आत व बाहेर सारखेच आहे जसे काय बाहेर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंच तत्वे आहैत व ते एकमेकांचे शत्रू आहेत जसे काय अग्निला पाणी विझवून टाकते वायूमुळे अग्नि विझतो पृथ्वीमुळे पोकळी भरून निघते जरी ते एकमेकांचे शत्रू आहेत तरी ते गुण्यागोविंदाने नांदतात व एकमेकांवर हल्ला करत नाहीत कारण श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की जोपर्यंत मी आहे तो पर्यंत त्यांची हिंमत नाही की एकमेकांवर हल्ला करतील पण जर का मी निघून गेलो की मग ते एकमेकांंवर हल्ला करून नेस्तनाबूत करतील तसेच माणसाचे शरीर या पाच तत्वांनी बनलेले आहे पृथ्वी म्हणजे मांस आप म्हणजे पाणी तेज म्हणजे जठराग्नी वायू म्हणजे हवा आकाश म्हणजे पोकळी जोपर्यंत आत्मा आहै तोपर्यंत ते गुण्यागोविंदाने नांदतात पण एकदा का आत्मा गेला तर मग ते एकमेकांवर हल्ला करतात व प्रत्येक तत्व आपल्या मुळ तत्वाला जावून मिळते मांसल भाग हा मातीमध्ये विलीन होतो पाणी आटून जाते वायू म्हणजे हवा ती हवेत मिसळून जाते जठराग्नी विझून जातो कारण तो मुळ अग्नित परत जातो पोकळी ही विशाल पोकळीत समाविष्ट होते व काही दिवसातच सर्व तत्वे निघून जावून फक्त सापळा शिल्लक राहतो व काही दिवसांनी तो ही मातीत विलीन होतो म्हणजे जे बाहेर आहे ते आत आहे जो बाहेर आहे तो आतमध्ये आहे व सारखीच क्रिया करतो आहे म्हणून म्हणतात बाहेर विशाल जगात त्याला शोधण्यापेक्षा आत शोधला तर लवकर सापडेल असे म्हणतात की नुसत्या संकल्पाने तो विश्वाची निर्मिती करतो मग आपणही नुसता मनात संकल्प आणला की एकदिवस ती गोष्ट समोर येते तो जे जे बाहेर करतो ते ते सर्व तो आत करतो मग घेऊ या त्याचा आतमध्येच शोध .जमेल आपल्याला तसा प्रयत्न करु या. तसेच घरातील एक व्यक्ती असते की ज्यामुळे घरातील विविध स्वभावाचे माणसे एकत्र राहतात ती व्यक्ती घरातून कायमची गेली की मग ते विविध प्रकारच्या स्वभावाची आपलीच माणसे एकमेकांशी भांडतात व भांडणे एवढे विकोपाला जाते की घर तुटते घरातील माणसात वाटणी होते वेगळे राहतात व काही तर एकमेकांचे तोंडही पाहत नाही कारण मुख्य व्यक्ती निघून गेल्यामुळे त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते व स्वैराचार किंवा मनोमार्गाने वागायला लागतात त्यामुळे त्यांच्यात शत्रूत्व निर्माण होते त्यामुळेच ती मुख्य व्यक्ती फार महत्वाची असते बघा विचार करा तुम्हाला आला असेल अनुभव
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment