सगळेच टेंपररी
जेव्हा नोकरीत आपण permanent होत नाही तेव्हा भीती असते नोकरी जाण्याची तेव्हा आपण अत्यंत वक्तशीरपणा ठेवतो आपल्याकडून कोणती चूक होणार नाही याचीृकाळजी घेतो भांडणतंटे यापासून लांब राहतो वरीष्ठ लोकांची मर्जी संपादन करतो दिलेले काम कुरकुर न करता व्यवस्थितपणे करतो म्हणजेच आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाची छाप आपण पाडतो मग जीवनात सुध्दा आपण टेंपररी आहोत कधीही बोलावणे येऊ शकते कुणीही permanent नाही सगळेच टेंपररी आहेत असे असून सुध्दा किती बिनधास्त जगतो जे करु नये ते करतो जे बोलू नये ते बोलतो जे ऐकू नये ते करतो जे पाहू नये ते पाहतो जे खाऊ नये ते खातो जे पिऊ नये ते पितो कारण आपल्याला आपला बाॅस कोण आहे हेच माहीत नाही जरी माहीत असेल तरी त्यावर विश्वास नाही व स्वत:ला कुणीही टेंपररी समजत नाही तसेच आपण भ्रमात जगतो आहोतआपण कुणीतरी आहोत ही हवा आपल्यात घुसली आहे व काहीही केले तरी माझे कुणी काहीच बिघडू शकत नाही असा फाजील विश्वास भरलेला असतो ज्यावेळी जाणीव होईल की आपण टेंपररी आहोत त्यावेळी जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल स्वत:कडे पाहण्याचा बदलेल नम्रपणा ठासुन भरेल क्षमा करण्याची वृती निर्माण होईल कुसंगती पासुन दूर जाण्याची बुध्दि निर्माण होईल लोकांची मदत करायला मिळणे म्हणजे देवाने दिलेली एक मोठी संधी दिली असे वाटायला लागेल .शरिरात मनात शांती प्रवेश करेल समाधानी वृती निर्माण होईल सकारात्मक दृष्टिकोन होईल पदोपदी देवाला धन्यवाद देणार सुख दु:खाकडे अलिप्तपणे पाहण्याची वृती निर्माण होईल व एकूणच जीवन बदलून जाईल . जय श्रीकृष्ण
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment