वैर
मासा पाण्यात जन्माला येतो व पाणी हेच त्याचे जग असते पाण्याच्या बाहेर तो जगू शकत नाही म्हणून माशाने पाण्याशी वैर धरायचे नाही. जरी वैर धरले ते ही पाण्यात राहूनच. वैर धरून त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला की आयुष्य संपलेच म्हणून समजा तसेच सर्व प्राणीमात्रांनी हवेशी वैर धरायचे नाही हवेपासून दूर गेलात तर लगेच संपलातच म्हणून समजा कारण हवेशिवाय एक क्षणही प्राणी पक्षी वनस्पती राहू शकत नाही तसेच कुणी म्हणेल मी सूर्याशी वैर धरतो व त्याचा थोडाही प्रकाश मला नको आहे तर ते मृत्यूलाच बोलावणे सारखे झाले.मधमाशी म्हणेल मी फुलांशी वैर धरते मग तिचे जगणंच थांबणार त्यावेळी. सांगायचे तात्पर्य म्हणजे आपण ज्या माणसांशिवाय जगू शकत नाही जे माणसे आपला श्वास आहेत ते आहेत म्हणून जगायला काहीतरी अर्थ असतो .त्यांना वजा केल्यावर जीवनाची बाकी शून्य येते .ज्यांच्याबरोबर आपला दिवस व रात्र छान जातात जे आपल्या उत्साहाचे श्रोत आहेत जे जगायची प्रेरणा आहेत अशा माणसाशी कधी वैर धरू नये याचा अर्थ असा नाही की ते कसेही वागले तरी सहन करायचे बिलकूल नाही. वादविवाद अवश्य करावेत समज गैरसमज वेळोवेळी दूर करावेत पण ज्यावेळी बोलणे आपसात बंद होईल त्यावेळेपासून ती व्यक्ती हळूहळू आपल्यापासून लांब जायला सुरवात होते व एक दिवस एवढी लांब जाते की दिसेनाशी होते व नंतर तिच्या पर्यंत पोहचणे अशक्य .ती तुमच्या हाकेच्या अंतरावर असेल पण मनाने फार दूर की पुन्हा कधीच जवळ येऊ शकत नाही व ती तुमचा श्वास असेल तर मग रोजचे जगणे अवघड बनून बसते व एक दिवस मृत्यू जवळ येतो व जीवन संपते म्हणून अशा व्यक्तीशी कधीही वैर धरू नये काहीवेळा ती व्यक्ती आपले जगणे नसते व दूर गेली तरी फरक पडत नसतो पण दैनंदिन कामं तिच्याशिवाय आपण करू शकत नाही मग ती आपला बाॅस असेल किंवा अजून कुणी तेव्हा नाईलाजाने का होईना कामासाठी तिच्याशी वैर धरता कामा नये .काहींशी वैर चांगले असते म्हणजे त्याच्या बोलण्याचा वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही असे माणसे लांबच बरे असतात बघा पटतं का.
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment