शेतकरी
काय केले पाऊसा तू
नाही बरसला चांगला
सारी पिके गेले करपून
शेतकरी झाला पांगळा
होते नव्हते सगळे भांडवल
शेतीत टाकले
आला नाही हातात पैसा
देवा सगळे पिकं वाळून गेले
शेतकरी झाला आता पोरका
नाही त्याला कुणाचा आधार
दुष्काळामुळे घेतली त्याने धास्ती
झाला तो आता निराधार
पोटाची खळगी कशी भरावी
ही लागली त्याला चिंता
झाला तो कर्जबाजारी
विचारत नाही त्याला कुणी आता
जमिनीवर पडल्या मोठमोठ्या भेगा
त्यातून दिसते त्याची दैना
कोण होईल त्याचा कैवारी
कसं जगावे रे राणा
तुचं फिरवली आमच्याकडे पाठ
केले हवामानाचे अंदाज खोटे
आम्ही कुणाकडे रे जावे
दमलो मारून खेटे
मुलामुलींचे शिक्षण लग्न
आम्ही कसे करावे
रात्र रात्र येत नाही रे झोप
मग आम्ही फक्त मरून जावे
नको जन्म रे शेतकर्यांचा
जीव असतो कायम टांगनीला
कुणालाच आमचं नाही पडलं
जीव येतो आमुचा काकुळतीला
पिण्याच्या पाण्यासाठी लावतो
लांबच लांब आम्ही रांगा
कळले आम्हांला उपयोग नाही
काही करून त्रागा
नको पिझ्झा बर्गर हाॅटेलिंग
काही आम्हांला
दोन वेळची भाकरी
ही हवी आमच्या पोटाला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment