Skip to main content

मला माहीती आहे

मला सर्व माहीत आहे
बरेच जणांना काही सांगितले तर म्हणतात मला सगळं माहीत आहे जे माहीत आहे ते मात्र बाहेरचे .आत काय चालले आहे हे काहीच माहीत नाही प्रत्येक सेकंदाला आपल्या शरीरातील किती पेशी मरतात व किती नवीन तयार होतात याची पुसटशी कल्पना आपल्याला नसते प्रचंड बदल दर सेकंदाला आपल्या शरीरात होत असतो पण आपण मात्र अनभिज्ञ असतो आपण फक्त खाण्याचे काम करतो पण त्यापासून कोणकोणते घटक शरीरात तयार होतात हे मात्र आपल्याला कधीच समजत नाही व एवढ्या हालचाली शरीरात अहोरात्र चालू असतात पण त्यात आपली भूमिका शून्य.बालपण कधी संपले प्रौढ कधी झालोत म्हातारपण कधी आले  हे मात्र बदल आपल्यात कधी झालेत कुणी केलेत हे आपल्याला समजण्याच्या आधीच झालेत . आपले लक्ष दुसर्‍यांकडे नेहमी असते पण स्वत:त एवढे बदल होऊनही आपले जीवन आपल्याला स्थिर वाटते लहाणपणीचा फोटो तरूणपणाचा फोटो व म्हातारपणाचा फोटो एकत्र ठेवल्यास तीनही व्यक्ती वेगळ्या दिसतात .आपल्या आवडीनिवडी बदलेल्या असतात स्वभावात बदल झालेला असतो म्हणून स्वत:कडे जरा बघितले तर अजून काय होतात हे लक्षात येईल बघा विचार करा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...