Skip to main content

दृष्टिकोन

दृष्टिकोन
मला वाटते आनंद व दु:ख हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते लहाणपणी  पैसे नसल्याने आई भाजीत तेल कमी टाकायची व साखर चहामध्ये कमी तेव्हा वाटायचे पैसे नसल्याने कमी तेलाची व कमी साखरेचा चहा घ्यावा लागतो त्यामुळे मन कष्टी व्हायचे व स्वत:ला कमी समजायचो  तसेच टीव्ही नसल्याने ज्यांच्याकडे असायचा त्याचा अभिमान वाटायचा  पण आज पैसे मुबलक राहूनही तब्बेतीसाठी जेवढे आई तेल टाकायची भाजीत  त्यापेक्षा कमी वापरतो तसेच चहा तर घेतच नाही पण आज कमी तेल वापरतो चहा घेत नाही असे अभिमानाने सांगतो व खातांना आनंद वाटतो कारण दृष्टिकोनमध्ये फरक पडला परिस्थिती सारखीच पण दृष्टिकोन बदलला त्यामुळे जी गोष्ट दु:ख देत होती तीच गोष्ट आज आनंद देत आहे म्हणजेच आनंद व दु:ख हे दृष्टिकोनावर अवलंबून आहे तसेच आता मोठा स्मार्ट टी व्ही आहे पण डोळ्यांच्या काळजीने जास्त बघणे टाळतो व जेवढी टी व्ही नाही बघितली तेवढे बरे वाटते पण लहाणपणी टीव्ही नसल्याने दु:ख वाटायचे आज वाटते की बरे झाले टी व्ही नव्हती त्यामुळे आज डोळे चांगले राहिलेत.  तेल व साखर कमी होती म्हणून बाकीचे आजांरापासून सुटका झाली तसेच टीव्ही नसल्याने लहाणपणी अभ्यांसामध्ये वेळ निघून जायचा व त्याचे फळ आज चांगल्या प्रकारे मिळत आहे  लहाणपणी दोनच वेळा जेवण व्हायचे कारण नाष्टा प्रकारच माहीत नव्हता आता डायट मुळे नाष्टा बंद करून दोनच वेळा खातो लहाणपणी वाइट वाटायचे पण आज आनंद वाटतो कारण चरबी साठली नाही  . दृष्टिकोन बदलला. म्हणून दृष्टिकोन बदलण्यासाठी योग्य व्यक्ती वेळोवेळी भेटली पाहिजे किंवा परिस्थितीमुळेही दृष्टिकोन बदलतो .त्यामुळे ज्यावेळी एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपला दृष्टिकोन बदलून घ्यावा मग तीच व्यक्ती छान वाटायला लागेल पूर्ण रोडवर काटे आहेत तर ते सर्व काटे साफ करण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घालून रस्ता पार केलेला बरा .दुसर्‍याला बदलण्यापेक्षा स्वत:च्या दृष्टिकोनात बदल केलेला सर्वात चांगला कारण काही व्यक्ती कधीच बदलत नाही तेव्हा आपल्याला मानसिक त्रास होतो तेव्हा स्वत:चा दृष्टिकोन बदलला की तीच व्यक्ती  चांगली दिसायला लागते म्हणून म्हणतात पूर्ण जग हिरवे बघायचे असेल तर हिरवा गाॅगल घालून बघा .त्यामुळे जसे जग तुम्हांला पाहिजे किंवा समोरची व्यक्ती जशी तुम्हांला पाहिजे तसा दृष्टिकोन बघण्याचा बदलला की मग ती तशीच दिसायला लागेल त्यामुळे मनस्तापापासून सुटका होईल व जीवन आनंदी होईल .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...